भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ज्याची सुरूवात (22 नोव्हेंबर) पासून होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी पर्थच्या स्टेडियमवर आमने-सामने असणार आहेत. तत्पूर्वीच भारतीय खेळाडूंबद्दल चर्चा जोमाने सुरू आहे. एकीकडे विराट कोहली (Virat Kohli) आहे, तर बाकी सर्वांच्या नजरा जसप्रीत बुमराहवर (Jasprit Bumrah) असतील, ज्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत 7 सामन्यांत 32 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे बुमराह देखील ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये चर्चेत आहे.
ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) 1970च्या दशकापासून ऑस्ट्रेलियन संघात भीती निर्माण करणारा गोलंदाज म्हणून सादर केला जात आहे. 1970च्या दशकात वेस्ट इंडिजचे गोलंदाज सर्वोत्तम फलंदाजी लाइनअप देखील नष्ट करायचे. एका पॉडकास्टवरील चर्चेदरम्यान ट्रॅव्हिस हेडला (Travis Head) विचारण्यात आले की, बुमराहचा सामना करणे त्याला कसे वाटते, तेव्हा हेडने सांगितले की बुमराहचे चेंडू खेळणे अशक्य आहे.
ट्रॅव्हिस हेड (Travis Head) म्हणाला की, “तुम्ही एक पाऊल पुढे जाण्याचा विचार करत आहात असे तुम्हाला वाटते, परंतु मला वाटते की बुमराह उत्कृष्ट आहे. खेळाचे स्वरूप कोणतेही असो, बुमराह अविश्वसनीय आहे. बुमराह भारतासाठी ट्रम्प कार्ड आहे आणि तो एक विकेट आहे. जेव्हा विकेट घेण्याचा विचार येतो तेव्हा कर्णधार त्याच्याकडे वळतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने बहुतेक वेळा संघाला विकेट्स मिळवून दिल्या आहेत, मोठ्या प्रसंगी आपल्याला मोठ्या खेळाडूंची गरज आहे, मला वाटते बुमराह हा सर्वात मोठा खेळाडू आहे.”
पुढे बोलताना हेड म्हणाला, “जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीत अचूकता आहे, तो पाहिजे तिथे गोलंदाजी करू शकतो. मग तो बाउन्सर बॉल असो वा यॉर्कर. याशिवाय ताशी 140 किमी वेगाने चेंडू दोन्ही दिशेने स्विंग करण्याची क्षमता हेही त्याचे सर्वात मोठे बलस्थान आहे. सध्याच्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये बुमराह सर्वोत्तम गोलंदाजी सरासरीने गोलंदाजी करतो. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे आकडे हे पुरावे आहेत की तो प्रत्येक 22 धावांवर एक विकेट घेतो.”
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; भारताने ऑस्ट्रेलियात कधी खेळला होता शेवटचा सामना? काय होता निकाल?
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीच्या इतिहासातील भारताचे मोठे रेकाॅर्ड…!
शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल मोठे अपडेट..! कधी करणार पुनरागमन?