---Advertisement---

एकेवेळी दिल्लीकर असलेल्या बोल्टने दिल्लीलाच रडवले, सलग ४ सामन्यात केला खास विक्रम

On: मंगळवार, नोव्हेंबर 10, 2020 8:03 PM
---Advertisement---

आयपीएल २०२०चा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात मंगळवारी झाला. या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलदांजीचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांना पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा झटका बसला. मार्कस स्टॉयनिस पहिल्याच चेंडूवर बाद झाला. या विकेटबरोबर मुंबईकडून गोलंदाजी करणाऱ्या ट्रेंट बोल्टने विकेटबरोबर एक खास विक्रमही केला.

आयपीएल एकाच हंगामात पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज
ट्रेंट बोल्टने या आयपीएल हंगामात पहिल्या षटकात तब्बल ८ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. बोल्टने या हंगामात एकूण १५ सामन्यात २३ विकेट्स घेतल्या असून त्यातील ८ विकेट्स या पहिल्या षटकात घेतल्या आहेत. तसेच २३ पैकी १६ विकेट्स या पहिल्या ६ षटकांतीलच आहेत. यापुर्वी एकाच हंगामात पहिल्याच षटकात सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम हा भुवनेश्वर कुमारने केला होता. त्याने २०१६ हंगामात पहिल्याच षटकात ६ विकेट्स घेतल्या होत्या.

दिल्लीला सलग चार सामन्यात दिला त्रास
ट्रेंट बोल्टने आयपीएल २०२०मध्ये दिल्ली विरुद्ध झालेल्या ४ सामन्यात पहिल्याच षटकात विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. याबरोबर त्याने २०१३ साली मिचेल जॉन्सनने केलेल्या १६ विकेट्सच्या पराक्रमाची बरोबरी केली आहे. या हंगामात पहिल्याच चेंडूवर फायनलमध्ये विकेट घेणारा गोलंदाज होण्याचा विक्रमही बोल्टने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-IPL: ‘हा’ आहे सर्वाधिक फायनल सामने खेळणारा संघ

-IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात

-IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी

ट्रेंडिंग लेख-

-चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल

-राजधानी एक्सप्रेस ! ‘हा’ एकटा एकीकडे आणि दुसऱ्या संघाचे आख्खे गोलंदाज एकीकडे, वाचा दिल्लीच्या सरकार गोलंदाजाबद्दल

-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---