---Advertisement---

आयपीएलमध्ये भल्याभल्यांना रडवणारा मुंबई इंडियन्सचा शिलेदार म्हणतोय, यावेळी माझं खेळायचं नाही पक्कं

On: बुधवार, जुलै 22, 2020 1:23 PM
---Advertisement---

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्डने २०२० आयपीएलमध्ये खेळण्याचं काहीही पक्कं नसल्याचं सांगितलं आहे. आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी तो जगभरात ओळखला जातो.

न्यूझीलंड वन न्यूज पोर्टलबरोबर बोलताना त्याने हे सांगितले आहे. आपल्या परिवाराच्या हिताचा निर्णय तेव्हा मी घ्यायला प्राधान्य देईल, असे यावेळी बोल्ट म्हणाला.

२६ सप्टेंबर ते ८ नोव्हेबंर २०२० या काळात आयपीएल दुबईमध्ये होण्याची वृत्त येत आहेत. यात तीन स्टेडियमवर ही स्पर्धा होणार आहे. विश्वचषक व आशिया कप स्पर्धा रद्द झाल्यामुळे आता आयपीएलचा मार्ग पुर्णपणे मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर परदेशातील खेळाडूंनी आता भाष्य करायला सुरुवात केली आहे.

बोल्ट गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला होता. परंतू या हंगामात त्याला मुंबई इंडियन्सकडून संधी मिळाली आहे.

बोल्टने आयपीएलमध्ये ३३ सामन्यांत २९.४७च्या सरासरीने ३८ विकेट्स घेतल्या असून फलंदाजीत १२ धावा केल्या आहेत. हैद्राबाद, कोलकाता, दिल्ली व मुंबई अशा संघांकडून त्याने आयपीएलचे सामने खेळले आहेत.

वाचा- टेन्शन वाढलं! क्रिकेटमधील उभारता सितारा सगल चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---