---Advertisement---

कमबॅकमध्ये कडाडला बोल्ट! फक्त 14 चेंडूत केली इंग्लंडची वाताहात

---Advertisement---

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना कार्डिफ येथे खेळला जात आहे. मालिकेत आघाडीवर असलेल्या न्यूझीलंड संघाने या सामन्यात देखील शानदार सुरुवात केली. तब्बल वर्षभरानंतर न्यूझीलंडच्या वनडे संघात पुनरागमन करत असलेल्या वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने आपल्या पहिल्या तीन षटकातच इंग्लंडचे तीन प्रमुख फलंदाज तंबूत पाठवले.

मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 8 गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर या सामन्यात न्यूझीलंडने कायले जेमिसन याच्या जागी बोल्टला संधी दिली. केंद्रीय करारातून बाहेर असल्यामुळे बोल्ट मागील वर्षभरापासून न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. आगामी विश्वचषकाचा विचार करून त्याला संघात संधी देण्यात आली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने स्वतः न खेळण्याचा निर्णय घेतलेला.

या सामन्यात संधी मिळाल्यानंतर त्याने आपल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर जॉनी बेअरस्टो याला सॅंटनरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर, तिसऱ्या चेंडूवर जो रूट याला त्याने बाद केले. त्यानंतर पुढच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने बेन स्टोक्सला‌ माघारी धाडले. पुनरागमनातील आपल्या पहिल्या 14 चेंडूमध्ये 1 धाव देत एका निर्धाव षटकासह तिघांना तंबूचा रस्ता दाखवला.

यानंतरही इंग्लंड संघाची वाताहात थांबली नाही. मॅट हेन्री याने हॅरी ब्रुक व मिचेल सॅंटनरने जोस बटलरला त्रिफळाचीत करत, इंग्लंडची अवस्था 5 बाद 55 अशी केली. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने 291 धावा उभ्या केल्यानंतर, न्यूझीलंडने हे आव्हान पार केले होते. डेवॉन कॉनवे व डेरिल मिचेल यांनी नाबाद शतके करत संघाला विजय मिळवून दिला होता.

(Trent Boult Fiery Spell On His Comeback In ODI Side After 1 Year Against England)

हेही वाचाच-
बदला घेतलाच! पहिल्याच ओव्हरमध्ये हिटमॅनने शाहिनला भिरकावला, पाहा कडक सिक्स
श्रेयस पुन्हा दुखापतग्रस्त! पाठीच्या दुखण्याने खाल्ली उचल, वर्ल्डकपआधी वाढली चिंता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---