गेल्या काही दिवसांपासून डोळ्यात तेल घालून सर्वजण वाट पाहात असेलला तो विशेष दिवस अखेर उजाडला आहे. मंगळवारी (१० नोव्हेंबर) दुबई आंततराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२०चा अंतिम सामना होणार आहे. तत्पुर्वी मुंबईसाठी मोठी दिलासादायक बातमी पुढे आली आहे. काही दिवसांपुर्वी दुखापतग्रस्त झालेला वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आता पूर्णपणे फिट झाला आहे. स्वत: मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने याविषयी माहिती दिली आहे.
रोहित शर्माने दिले अपडेट
“काही दिवसांपुर्वी दिल्लीविरुद्ध झालेल्या क्वालिफायर १ सामन्यात बोल्टला ग्रोइनची साधारण दुखापत झाली होती. आता तो लवकरच दुखापतीतून सावरला असून महत्त्वपूर्ण अंतिम सामन्यात खेळताना दिसेल. आम्हाला अपेक्षा आहे की, तो अंतिम सामन्यात संघाला महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून देईल,” असे रोहितने सांगितले आहे.
एकवेळ होता दिल्ली कॅपिटल्सचा सदस्य
महत्त्वाचे म्हणजे, बोल्ट गेल्या २ वर्षांपासून दिल्ली संघाचा भाग होता. मात्र आयपीएल २०२०च्या लिलावात दिल्लीने त्याला ट्रेड करत मुंबईकडे सोपवले. परंतु, दिल्लीने त्यावेळी घेतलेला हा निर्णय आता त्यांच्यासाठीच घातक ठरला असल्याचे दिसत आहे. कारण याच बोल्टने दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर १ सामन्यात कमालीची गोलंदाजी केले. त्याने २ षटकात केवळ ९ धावा देत २ फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले होते. तर अंतिम सामन्यातही दिल्लीच्या फलंदाजांपुढे त्याचे आव्हान असेल.
ट्रेंट बोल्टची कामगिरी
बोल्टची आयपीएलमधील गेल्या २ वर्षांतील आकडेवारीपेक्षा यंदाची आकडेवारी उल्लेखनीय राहिली आहे. त्याने २०१८-१९मध्ये दिल्लीकडून १९ सामने खेळले असून २३ विकेट्स घेतल्या होत्या. यावर्षी त्याने आतापर्यंतच्या १४ सामन्यात एकूण २२ विकेट्सची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2020 FINAL : मुंबई पाचव्यांदा ट्रॉफी जिंकणार का दिल्ली पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न साकारणार?
ही कसली भानगड! मार्कस स्टॉयनिसच्या हातात दिसली ‘हल्क’ची मूर्ती, पण का?
ट्रेंडिंग लेख-
एकाच षटकात आयपीएलचा इतिहास बदलणारा ‘एन्रीच नॉर्किए’
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ