इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत चाहत्यांना आणखी एक अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. शनिवारी (१७ एप्रिल) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमने सामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने १३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील दुसऱ्या डावात मुंबई इंडियन्स संघ गोलंदाजी करत असताना ट्रेंट बोल्टसोबत असे काही घडले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर १५० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सलामी फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या सामन्यात ट्रेंट बोल्ट आपल्या सुरुवातीच्या षटकात महागडा ठरला होता. त्याला जॉनी बेअरस्टोने एकाच षटकात १८ धावा कुटल्या होत्या. याचा परिणाम त्याच्या क्षेत्ररक्षणावर देखील दिसून आला.
तर झाले असे की, सनरायझर्स हैदराबाद संघ फलंदाजी करत असताना डावातील पाचव्या षटकातील सहाव्या चेंडूवर डेविड वॉर्नरने जोरदार शॉट लगावला होता. यावेळी ट्रेंट बोल्ट हा मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत होता. तो चेंडू अडवण्यासाठी बोल्ट धावला, परंतु त्याला त्याचा तोल सावरता आला नाही. तो अगदी मजेशीर रित्या मैदानावर पडला. त्याला चौकार अडवण्यास देखील अपयश आले. यामुळे कृणाल पंड्या थोडा निराश दिसून आला होता.
https://twitter.com/lfctarun/status/1383477056885780484?s=20
Boult Ft Master pic.twitter.com/hfHqYvyjvg
— Harshith, Injam #IamWithCBN (@injamharshith) April 17, 2021
Nobody :
Trent boult stopping boundary: pic.twitter.com/BO4grsS5MO
— Baklol ninja (@Picsart_wale) April 17, 2021
Trent Boult surfing while chasing the ball. pic.twitter.com/E8Y1NBcgbZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 17, 2021
Boult 🏊😂#IPL2021 #MIvSRH pic.twitter.com/wt5M5OvcIM
— RVCJ Media (@RVCJ_FB) April 17, 2021
Stock prices after I invest in anything pic.twitter.com/E7ZFpTm3nn
— Sagar (@sagarcasm) April 17, 2021
तसेच ट्रेंट बोल्टने या डावात ३.४ षटक गोलंदाजी करत ३ गडी बाद केले होते. एका षटकात १८ धावा देऊन सुद्धा त्याने ३.४ षटक गोलंदाजी करत अवघ्या २८ धावा खर्च केल्या. त्याने राशिद खान, भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमद यांना बाद केले. तर राहुल चाहरने या सामन्यात देखील उत्कृष्ट कामगिरी करत ३ गडी बाद केले आहेत. यासोबतच जसप्रीत बुमराह आणि कृणाल पंड्या यांना एक एक गडी बाद करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी
चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी