भारतात डब्लूडब्लूई सुपरस्टार यांचे किती चाहते आहेत हे नव्याने सांगण्याची काही गरज नाही. जॉन सीना, डॉल्फ झिगलर, शार्लोट फ्लैर, बिग शो हे स्टार आल्यानंतर भारतीय चाहत्यांनी त्यांचे केलेले स्वागत आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लागलेली झुंबड हे अनेकांसाठी नेहमी चर्चेचे विषय झाले आहे. त्यात जर डब्लूडब्लूई मधील सर्वात मोठा मास्टरमाईंड, ‘दी गेम’ म्हणून ओळखला जाणारा आणि १४ वेळा चॅम्पियन ‘ट्रिपल एच’ भारतात आल्यानंतर त्याचे जल्लोषात स्वागत होणे साहजिकच आहे.
नव्वदीच्या दशकापासून डब्लूडब्लूई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असणारा हा सुपरस्टार जेव्हा जेव्हा रिंग मध्ये प्रवेश करतो तेव्हा सारे जग त्याच्या कौशल्याचे दिवाने होत जाते. हा सुपरस्टार काल मुंबईमध्ये दाखल झाला आणि येथे मिळालेल्या स्वागत आणि आदरतथ्याने खूप भारावून गेला. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद भारतीय चाहत्यांनी दिला.
पहा ‘ट्रीपल एचने’ पोस्ट केलेला हा ट्वीट:
Been awhile since I've been in India…. immediately remembered why I love it.
Thanks for the warm reception @WWEIndia pic.twitter.com/JjwDPpNJIp— Triple H (@TripleH) October 3, 2017
खूप वर्षांनी भारतामध्ये आलेल्या ट्रिपल एचचे स्वागत मुंबईमध्ये दाखल झाल्यापासूनच सुरु झाले. त्याचे प्रथम विमानतळावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर चाहत्यांनी त्याच्याभोवती फोटो काढण्यासाठी घेरा घातला. या आदरानंतर ट्रिपल एचने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून फोटो आणि विडिओ शेअर केले आणि त्यात तो म्हणाला, “मी खूप वर्षांनी भारतात आलो आणि मला लगेच आठवले की मला हा देश का आवडतो. तुम्ही केलेल्या स्वागतासाठी धन्यवाद.”
पारंपारिक भारतीय पद्धतीत ट्रिपल एचचे झालेले स्वागत:
Landed in Mumbai and was warmly greeted. A beautiful country with wonderful cultures, excited for my visit. @WWEIndia pic.twitter.com/8xKrw2VPoN
— Triple H (@TripleH) October 3, 2017