मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२२च्या चालू हंगामात अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाही. त्यांनी आतापर्यंत ९ सामने खेळले असून त्यापैकी ८ सामने गमावले आहेत. यासह मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. दरम्यान आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबईच्या ताफ्यात मोठा बदल झाला आहे.
मुंबईचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स याच्याजागी दक्षिण आफ्रिकेचा ट्रिस्टन स्टब्स संघाशी जोडला गेला आहे. मिल्सच्या घोट्याला दुखापत जाली असून तो उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर झाला आहे. अशात त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेचा २१ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला संधी दिली गेली आहे.
Squad Update: Tristan Stubbs to replace Tymal Mills in #MumbaiIndians 2022 squad.#OneFamily #DilKholKe pic.twitter.com/kwSkrpvMct
— Mumbai Indians (@mipaltan) May 5, 2022
ट्रिस्टन स्टब्सचे अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालेले नाही. परंतु त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र धुमाकूळ घातला आहे. त्याने आतापर्यंत १७ टी२० सामने खेळताना ५०६ धावा केल्या आहेत. १५७.१४च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ अर्धशतकेही निघाली आहेत. ट्रिस्टन स्टब्सला मुंबईने २० लाख रुपये खर्च करत संघात सहभागी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीला शिवी दिल्याने विराट झाला ट्रोल, पण सामन्यानंतरचा हा फोटो पाहून वाढेल कोहलीबद्दलचा आदर!
अर्जुन तेंडुलकर कधी करणार आयपीएल पदार्पण? मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांनी दिले ‘हे’ उत्तर