---Advertisement---

ना ट्रायल्स, ना ऑक्शन; मुंबईमध्ये डायरेक्ट निवड झाल्यानंतर अशी होती दक्षिण आफ्रिकी खेळाडूची प्रतिक्रिया

On: शनिवार, मे 7, 2022 8:34 PM
Tristan-Stubbs
---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२२च्या चालू हंगामात अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाही. त्यांनी आतापर्यंत ९ सामने खेळले असून त्यापैकी ८ सामने गमावले आहेत. यासह मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. दरम्यान आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबईच्या ताफ्यात मोठा बदल झाला आहे. मुंबईचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स याच्याजागी दक्षिण आफ्रिकेचा ट्रिस्टन स्टब्स संघाशी जोडला गेला आहे. आता २१ वर्षीय स्टब्सने मुंबई संघाशी जोडला गेल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मिल्सच्या घोट्याला दुखापत जाली असून तो उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर झाला आहे. अशात त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेचा २१ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला (Tristan Stubbs) संधी दिली गेली आहे. मुंबई संघाशी जोडला गेल्यानंतर स्टब्सने त्याला ही वृत्त मिळाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय (Tristan Stubbs Recalls Reaction) होती?, हे सांगितले आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

“मी सकाळी गोल्फ कोर्समध्ये होतो. माझ्या वडिलांनी मला फोन करून सांगितले की, मुंबई इंडियन्सकडून बोलावणे आले आहे. ही बातमी ऐकून मी आनंदाने वेडा झालो होतो. वास्तवात मला मुंबईच्या संघात निवडले गेले होते,” असे ट्रिस्टन स्टब्स म्हणाला. मुंबई संघाने त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1522213074484162561?s=20&t=T912TOQR6vs-u-hnC_QSig

ट्रिस्टन स्टब्सचे अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालेले नाही. परंतु त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र धुमाकूळ घातला आहे. त्याने आतापर्यंत १७ टी२० सामने खेळताना ५०६ धावा केल्या आहेत. १५७.१४च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ अर्धशतकेही निघाली आहेत. ट्रिस्टन स्टब्सला मुंबईने २० लाख रुपये खर्च करत संघात सहभागी केले आहे.

परंतु स्टब्सपूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा एक खेळाडू, डेवाल्ड ब्रेविस याला मुंबईने मेगा लिलावात खरेदी केले होते. त्याला आतापर्यंत बऱ्याच सामन्यांमध्ये संधीही मिळाली आहे आणि त्याने आपल्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावितही केले आहे. ब्रेविसने आतापर्यंत ६ सामने खेळताना २०.६७ च्या सरासरीने १२४ धावा केल्या आहेत. अशात मुंबईचा संघ उर्वरित सामन्यात ब्रेविस आणि स्टब्सपैकी एकाला खेळवतो की दोघांनाही एकत्र प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करतो, हे पाहाणे रोमांचक असेल.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘बास झालं, आता मुंबई त्याला संधी देणार नाही’, पोलार्डच्या खराब कामगिरीवर भारतीय दिग्गजाची प्रतिक्रिया

केएल राहुल सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, पाहा कोणी उधळलीत स्तुतीसुमने

सलग २ पराभवानंतर राजस्थानचे ‘रॉयल’ कमबॅक, पंजाबच्या ‘किंग्स’ला ६ विकेट्सने नमवत गुणतालिकेतील स्थान केले बळकट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---