फलंदाजीचे नंदनवन असलेल्या शारजाहच्या मैदानावर सोमवारी (९ नोव्हेंबर) महिला टी-२० चॅलेंजचा अर्थात महिला आयपीएलचा अंतिम सामना झाला. सुपरनोवाज विरुद्ध ट्रेलब्लेजर्स या दोन संघांत झालेल्या या सामन्यात ट्रेलब्लेजर्सने १६ धावांनी बाजी मारली. यासह पहिल्यांदाच ट्रेलब्लेजर्सने आयपीएल ट्रॉफी पटकावली.
या सामन्यात ट्रेलबेजर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद ११८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल सुपरनोवाज संघ २० षटकात ७ विकेट्स गमावत १०२ धावाच करुच शकला. यासह सुपरनोवाजचे चौथ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
सुपनोवाजकडून फलंदाजी करताना कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ३० धावा केल्या. तिने ३६ चेंडूत २ चौकार ही धावसंख्या गाठली. तसेच शशिकला श्रीवर्धने (१९ धावा), तानिया भाटिया (१४ धावा) आणि जेमिमाह रोड्रिगेज (१३ धावा) यांनीही दोन आकडी धावा केल्या. ट्रेलबेजर्सकडून गोलंदाजी करताना सलमा खतून हिने सर्वाधिक ३ विकेट्सचे योगदान दिले. तर दिप्ती शर्मानेही २ फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ट्रेलबेजर्सकडून कर्णधार स्म्रीति मंधानाने सर्वाधिक धावा केल्या. तिने ४९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार लगावत ६८ धावांची आक्रमक खेळी केली. तसेच सलामीवीर फलंदाज डिएंड्रा डौटिन हिनेही २० धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज जास्त १०पेक्षा जास्त धावा करु शकले नाहीत.
तर सुपरनोवाजकडून गोलंदाजी करताना राधा यादवने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर पूनम यादव आणि शशिकला श्रीवर्धने यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
महिला आयपीएल फायनल : सुपरनोवाज हॅट्रिक साधणार की ट्रेलब्लेझर पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न साकारणार?
महिला आयपीएल: ट्रेलब्लेझर-सुपरनोव्हास येणार आमने-सामने; कोण मिळवणार फायनलचं तिकीट?
महिला आयपीएल: मंधना, हरमनप्रीत, मिताली करणार नेतृत्व; असे रंगणार सामने
ट्रेंडिंग लेख-
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू