पुणे : ट्रू प्रीमियर लीगच्या झोनल सिलेक्शनचा समारोप सोहळा पुण्यातील नेहरु स्टेडियममध्ये भव्य समारंभाने झाला. यावेळी अभिनेत्री सई ताम्हणकर व अमृता खानविलकर यांची विशेष उपस्थिती होती. समारोप सोहळ्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम क्षेत्ररक्षण, सर्वोत्तम गोलंदाज, सर्वोत्तम झेल, सर्वोत्कृष्ट धावबाद, सर्वोत्कृष्ट चौकार, सर्वोत्कृष्ट षटकार, सर्वोच्च धावा आणि फॅन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट असे पुरस्कार देण्यात आले.
यावेळी फोर पिलर्स इव्हेंट मॅनेजमेंटचे संचालक समीर पवानी म्हणाले, पुण्यातून आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही पुण्यासाठी ४० संघ निवडले होते त्यापैकी २० संघ पुण्यासाठी निवडण्यात आले आहेत. पावसाळ्यानंतर हे २० संघ एकमेकांशी पुन्हा खेळतील. या भव्य समारोप सोहळ्याचे आयोजन आम्हाला मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल नेहरु स्टेडियम येथे करण्यात आले.
ट्रू स्पोर्ट्स, इंडियाचे सीइओ झहीर राणा म्हणाले, पुण्यातून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आम्ही इतर शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यास उत्सुक आहोत. आमच्याकडे महाराष्ट्रातून ६०,००० खेळाडूंनी ट्रू प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमासाठी नोंदणी केली आहे. इतर राज्यातूनही आम्हाला अशीच स्पर्धा आयोजित करण्याचे निमंत्रण आहे. मी ट्रू प्रीमियर लीग यशस्वी करण्यामध्ये हातभार लावणाऱ्या सर्वांचा शतशः ऋणी आहे.
समारोप सोहळ्यामधे विशेष आकर्षण होते ते बॉलीवूड गायक शद्ब साबरी याचे, ज्याने सर्वांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले. उदघाटन सोहळा नृत्य सादरीकरणाने पार पडला.
ट्रू प्रीमियर लीग बद्दल थोडक्यात
ट्रू प्रीमियर लीग हा भारतातील पहिला क्रिकेट टॅलेंट निवडणारा रिऍलिटी शो आहे. ज्यातून देशातील प्रत्येक ठिकाणाहून प्रतिभा असणारे खेळाडू शोधले जातात. टीपीएलचा प्रमुख उद्देश भारतातील प्रमुख २० राज्यांमध्ये हि स्पर्धा घेणे असून त्याची सुरवात महाराष्ट्रातून करण्यात आली आहे. नोंदणीनंतर महाराष्ट्रातील सर्व नोंदणी केलेल्यांची निवड चाचणी घेतली जाते. हि निवड चाचणी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये महिन्याभरात वेगवेगळ्या तारखांना घेतली जाईल. यातून राष्ट्रीय खेळाडूंचे एक पॅनल केले जाईल, ज्यामध्ये रणजी खेळाडू, राज्यस्तरीय खेळाडू तसेच राज्यस्तरीय अम्पायर यांचा समावेश असेल. नोंदणी केलेल्या खेळाडूंना एका शिबीरामार्फत योग्य मार्गदर्शन केले जाईल. या शिबिरामध्ये निवडकर्ते चाचणी घेऊन शेवटच्या ५०० टीम्समध्ये त्यांची निवड करतील. हि स्पर्धा क्रिकेट टॅलेंट हंट सोबत एक रिऍलिटी शो सुद्धा आहे. प्रत्येक संघ बाद फेरी मधून निवडला जाईल. परंतु, टीव्ही वरील प्रेक्षक त्यांच्या आवडत्या खेळाडूला एसएमएस द्वारे मत देऊन वाचवू शकतो. एखाद्या खेळाडूचा संघ जरी बाद झाला असेल तरीही त्याला मिळालेल्या मतांच्या जोरावर तो स्पर्धेत राहू शकतो.
ट्रू प्रीमियर लीगमध्ये क्रिकेटवर सादर केलेला पोवाडा…
https://youtu.be/hXRWrecBYF0