भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीच्या अपघाताची बातमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. परंतु ही बातमी अखेर खोटी असल्याचे समोर आले आहे.
चेन्नई संघाशी जोडलेल्या बालाजीचं नाव बुधवारी (१४ ऑक्टोबर) अचानकच ट्विटरवर ट्रेंड झाले. यासोबतच ट्विटरवर बालाजीचा अपघात झाल्याच्या बातम्या जोरदार व्हायरल झाल्या.
कॉन्टेस्ट दरम्यान पसरली बातमी
ट्विटरवर शारोनप्लाय या ट्विटर अकाउंटवरून एका कॉन्टेस्टचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान एक प्रश्न विचारला होता की, “आयपीएलमध्ये पहिल्यांदा हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूचे नाव काय?” लक्ष्मीपति बालाजीने २००८ साली किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील पहिली हॅट्रिक घेतली होती. या प्रश्नाचे उत्तर देताना अनेक चाहत्यांनी बालाजीचे नाव घेतले. त्यामुळे बालाजी ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला होता. त्यानतंर त्याच्या अपघाताची खोटी बातमी पसरवण्यात आली.
https://twitter.com/SharonPlyIndia/status/1316567470447230979
https://twitter.com/buzzing_trends/status/1316593354923110400
यावर चाहत्यांनी आक्षेप घेत खोटी बातमी परवणाऱ्या अकाउंटला रिपोर्ट करण्याची मागणी करण्यात आली.
https://twitter.com/madhavanarasani/status/1316587910812983298
https://twitter.com/Myos_pasm/status/1316589222669606912
सध्या बालाजी कुठे आहे?
बालाजी मागील काही वर्षांपासून आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. तो चेन्नई संघात गोलंदाजी प्रशिक्षक या पदावर कार्यरत असून सध्या युएईत संघासोबत बायो- बबलमध्ये आहे. १० ऑक्टोबरला चेन्नईच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये बालाजी कर्णधार एमएस धोनीसोबत चर्चा करताना दिसत होता.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1314866284534796288
भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज लक्ष्मीपति बालाजीला आज सर्वजण ओळखतात. तसं पाहिलं तर बालाजी भारतीय संघासाठी दीर्घ काळ खेळू शकला नाही. परंतु त्याने २००४ साली पाकिस्तान दौऱ्यावर कमाल दाखवत सर्व चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते.
त्याने आतापर्यंत ८ कसोटी सामने, ३० वनडे सामने आणि ५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ३७.१८ च्या सरासरीने २७ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने ३९.५२ च्या सरासरीने ३४ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२०त त्याने १२.१० च्या सरासरीने १० विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-दुःखद! प्रसिद्ध क्रिकेट समालोचकाचे निधन, खेळाडूंकडून शोक व्यक्त
-क्रिकेट जगत शोकसागरात.! तब्बल ४६६ विकेट्स घेणाऱ्या महान क्रिकेटरचा मृत्यू
-आयपीएलच्या प्रत्येक सिझनमध्ये शेवटचा चेंडू टाकणारे गोलंदाज
ट्रेंडिंग लेख-
-नवलंच! आयपीएल २०२०मधील ३ धडाकेबाज फलंदाजांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही
-IPL- दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये इशांत शर्माची जागा घेण्यास ३ खेळाडू तयार
-गौतम गंभीर का ठरला टीम इंडियासाठी संकटमोचक, हे दाखवून देणाऱ्या ३ खेळी