---Advertisement---

मराठमोळ्या क्रिकेटपटूचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत मिळाली संधी

On: शनिवार, जुलै 13, 2024 5:20 PM
---Advertisement---

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेनं पदार्पण केलं. त्याला आवेश खानच्या जागी संघात संधी मिळाली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार शुबमन गिल यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

29 वर्षीय तुषार देशपांडेला आयपीएलमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. त्यानं आयपीएलच्या मागील दोन हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना अनुक्रमे 21 आणि 17 बळी घेतले आहेत. तुषार देशपांडेला जेव्हा पदार्पणाची कॅप मिळाली, तेव्हा त्याच्यासोबत त्याची पत्नी नभा गड्डमवारही उपस्थित होती. आजचा सामना जिंकून भारतीय संघ 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी मिळवू शकतो.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेत टीम इंडियासाठी पदार्पण करणारा तुषार देशपांडे हा चौथा खेळाडू आहे. त्याच्या आधी अभिषेक शर्मा, रियान पराग आणि साई सुदर्शन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात तुषार देशपांडेच्या रुपात एकमेव बदल करण्यात आला.

5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेनं टीम इंडियाला 13 धावांनी पराभूत करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. परंतु दुसऱ्या सामन्यात गिल आणि कंपनीनं जोरदार पुनरागमन केलं. या सामन्यात अभिषेक शर्मानं 47 चेंडूत 100 धावांची खेळी केली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वालचं पुनरागमन झाल्यानंतर भारतीय संघ अधिक मजबूत झाला. भारतानं तिसरा सामना 23 धावांनी जिंकला. यासह टीम इंडिया सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.

चौथ्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11 

भारत – शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद

झिम्बाब्वे – वेस्ली माधवेरे, तदिवनाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदंडे (यष्टीरक्षक), रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताच्या माजी क्रिकेटपटूला कर्करोगानं ग्रासलं, कपिल देव यांची बीसीसीआयकडे मदतीची याचना
सायना नेहवालबाबत अवमानकारक वक्तव्य भारी पडलं, युवा क्रिकेटपटूला मागावी लागली माफी
अशक्य! क्रिकेट जगतातील हे 5 विश्वविक्रम मोडणे जवळपास कोणत्याही खेळाडूच्या अवाक्याच्या बाहेरच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---