चेन्नई सुपर किंग्स व मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याच्यासाठी मागील तीन ते चार महिने अत्यंत शानदार राहिले आहेत. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत त्याने चेन्नई सुपर किंग्सला विजेते बनवण्यात मोठी भूमिका बजावलेली. त्यानंतर काही दिवसातच त्याचा साखरपुडा देखील झाला. त्यानंतर त्याला आता आणखी एक मोठी संधी मिळाली आहे. आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याला पश्चिम विभागाच्या संघात संधी दिली गेलीये.
भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. दुलीप ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीनंतर आता या स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. या सामन्यांसाठी पश्चिम विभागाच्या संघात तुषार देशपांडे याची निवड झाली. यापूर्वी संघात निवड झालेल्या सौराष्ट्राच्या चेतन सकारिया याला दुखापत झाल्याने त्याला ही संधी मिळाली. चेतनची दुखापत बरी होण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.
तुषार याने यावर्षी आयपीएल हंगामात चेन्नई संघासाठी दर्जेदार कामगिरी केली. त्याने 16 सामने खेळताना 21 बळी आपल्या नावे केले. तो संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. यासह त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीवर नजर टाकल्यास दिसून येईल की, मुंबईसाठी खेळताना त्याने आतापर्यंत 29 सामन्यांमध्ये 80 बळी टिपले आहेत. पश्चिम विभागाचा दुलीप ट्रॉफीचा उपांत्य फेरीचा सामना मध्य विभागाविरुद्ध चिन्नास्वामी स्टेडियम येथे होईल.
दुलीप ट्रॉफीसाठी पश्चिम विभाग संघ- प्रियांक पांचाल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, हार्विक देसाई (यष्टीरक्षक), पृथ्वी शॉ, हेत पटेल (यष्टीरक्षक), सर्फराज खान, अर्पित वसावडा, अतित सेठ, शम्स मुलानी, युवराज डोडिया, धर्मेंद्रसिंह जाडेजा, चिंतन गजा, तुषार देशपांडे , अरझान नागवासवाला.
(Tushar Deshpande Include In West Zone Team For Duleep Trophy)
महत्वाच्या बातम्या –
चहलला आयसीसी स्पर्धांमध्ये संधी मिळत नसल्याने पेटून उठला गांगुली, म्हणाला, ‘भारतीय संघाला…’
‘आग लगे बस्ती में, बाबा अपनी मस्ती में’, विंडीज हारताच गेलने शेअर केला व्हिडिओ, चाहत्याची कमेंट चर्चेत