आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात मैदाना बाहेर देखील प्रेक्षकांमध्ये चांगलीच गरमागरमी असते. आयपीएलचा ‘एल क्लासिको’ या सामन्याकडे पाहिले जाते. उभय संघांमध्ये 2023 आयपीएलमधील पहिला सामना नुकताच खेळला गेला. यामध्ये चेन्नईने मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्याची किमया केली. मात्र, या सामन्यानंतर चेन्नईचा युवा वेगवान गोलंदाज व देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा तुषार देशपांडे हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. त्यानंतर आता त्याने या प्रकरणावर पडदा टाकला आहे.
वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहितने तीन चौकार व एक षटकार खेळला होता. मात्र, चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तुषार देशपांडे याने त्याची खेळी संपुष्टात आणली. तुषारने सरळ टाकलेला चेंडू रोहितला समजू शकला नाही व त्याचा त्रिफळा उडाला.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1645276831480971264?t=vK9zIL0GTjXqDEK8uIdcsg&s=19
याच घटनेनंतर सोशल मीडियावर तसेच काही वृत्तवाहिन्यांनी बातमी चालवली की, तुषार देशपांडे म्हणत आहे,
“रोहितला बाद करणे सोपे असते. तो विराट कोहली अथवा एबी डिव्हिलियर्स यांच्यासारखा असामान्य नाही.” या बातमीनंतर सोशल मीडियावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली. मात्र त्याने अशा प्रकारची कोणतीही मुलाखत दिली नसल्याचे सांगितले जात होते. आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा चेन्नईच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर अशी कोणतीही मुलाखत प्रसिद्ध झालेली नाही.
त्यानंतर तुषारने स्वतः सोशल मीडिया पोस्ट करत यामागील सत्यता सांगितली. त्याने लिहिले,
‘वरील सर्व बातम्या खोट्या आहेत. मला सर्व दिग्गजांबद्दल आदर असून, मी अशा कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केले नाही. कृपया खोट्या बातम्या चालवणे थांबवा.’
तुषारने यासह काही स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये अशा प्रकारच्या बातम्या दिसून येत आहेत.
(Tushar Deshpande’s Instagram story on misquotes happening on his name on taking wicket of Rohit Sharma)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिंकूने दाखवली खिलाडूवृत्ती! 5 षटकार ठोकल्यानंतर त्या गोलंदाजाला केला मेसेज, म्हणाला…
मिचेल मार्शच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस, प्रेयसी ग्रेटा मॅकसोबत अडकला लग्नबंधनात, पाहा फोटो





