भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंगहॅममध्ये सध्या कसोटी मालिका खेळली जात आहे. पहिल्या कसोटीच्या सामन्यांच्या ५ व्या दिवशी सातत्याने येत असलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे एकची चेंडूचा खेळ झाला नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. शेवटच्या दिवशी भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणखी १५७ धावांची गरज होती, तर इंग्लंडला अजून ९ विकेट्स घेण्याची गरज होती. अशा परिस्थितीत सामन्याचा निकाल अखेरच्या दिवशी लागण्याची शक्यता होती. पण पाऊस या सामन्यातील खलनायक ठरला. त्यामुळे चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बीसीसीआयने ट्रेंट ब्रिज मैदानाचे फोटो पोस्ट केले आहे. यामध्ये मैदानावर कव्हर घातलेले दिसत होते आणि गडद ढग देखील आलेले दिसत होते. हे सर्व पाहून चाहत्यांनी त्यावर आपला राग काढायला सुरुवात केली.
एक ट्विटर वापरकर्ता इतका संतापला की, त्याने इंग्लंडमध्ये क्रिकेटवर बंदी घालण्याविषयी बोलले आहे. दुसरा वापरकर्ता वाईट हवामानातही आशेचा किरण शोधत आहे. त्याने लिहिले की, आम्हाला हा सामना पूर्ण करण्यासाठी फक्त एका सत्राची गरज आहे. रिषभ पंत आणि रोहित शर्मा एकटेच सामना पूर्ण करतील.
एका वापरकर्त्याने बीसीसीआयवरच राग काढला आहे. त्याने लिहिले की, तुमच्यापेक्षा चांगले पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, इंग्लंड नेहमीच भारतीय क्रिकेट संघाबद्दल वाईट भावना ठेवतो. २०१९ च्या विश्वचषकाची उपांत्य फेरीतील सामना भारतीय न्यूझीलंडकडून पराभूत झाला. तेव्हाही पाऊसच कारण होते. आज ही तेच हवामान कारण आहे.
https://twitter.com/kpdhillon8051/status/1424320762337320967
https://twitter.com/ashishram25/status/1424321086561218560
Meanwhile @englandcricket : @BCCI used Dusty wickets, we are using Rain, what's the problem?#ENGvIND #ENGvsIND #Cricket #INDvENG #Bumrah #IndvsEng
— Dr. Vinay Sharma (@SharmaWrittings) August 8, 2021
Fuck off England cricket..Stop hosting tournament on your land..😏😡🤬🤬🤬 Clear win for India Today and last we got result as "Draw' #ENGvIND #WTC23 pic.twitter.com/MUbalRd11r
— Fari Khan (@ImFarikhan) August 8, 2021
Why can't every Test match have a reserve day ??? @ICC @BCCI #ENGvIND #testworldcup @englandcricket #newaccount #follow
— Siddharth jain (@sidcity08) August 8, 2021
Yes this happens most of the time#ENGVIND #Weather #Unlucky #India #Teamindia #Indiancricketteam @BCCI @ICC @imVkohli pic.twitter.com/9uRhorjB7L
— Mayur Shesh (@Mayurshesh33) August 8, 2021
India – we are winning the match
England weather – #ENGvIND #ENGvsIND #INDvENG #INDvsENG pic.twitter.com/TB9sWqBDZR— Naruto 45Stan (@Warrioromeg) August 8, 2021
या सामन्यात याआधीही पावसाचा व्यत्यय आला होता. पण अखेरच्या दिवशी एकही चेंडूचा खेळ न झाल्याने सामना अनिर्णित सुटला. आता या मालिकेतील दुसरा कसोटी सामना १२ ऑगस्टपासून लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मोहम्मद सिराज आता भारताचा दुसऱ्या पसंतीचा गोलंदाज ठरत आहे’, ऑसी दिग्गजाने केले कौतुक
विमानात एअर होस्टेसने सुरेश रैनाला म्हटले होते ‘मास्टर ब्लास्टर’चा मुलगा; सचिननेही घेतली होती मजा
जेव्हा एमएस धोनीने ‘या’ दिग्गजाचे न ऐकता केली होती दिनेश कार्तिकला गोलंदाजी; आता स्वत:च केलाय खुलासा