---Advertisement---

‘जरा तरी लाज असेल, तर कर्णधारपद सोड…’, WTC Finalमध्ये पराभूत होताच रोहितवर भडकले चाहते

On: रविवार, जून 11, 2023 8:09 PM
Rohit-Sharma-Troll
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभवाचा धक्का दिला. तसेच, स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला. हा ऑस्ट्रेलियाचा नववा आयसीसी किताब ठरला. या महत्त्वाच्या सामन्यात पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 280 धावांचे आव्हान होते. तसेच, त्यांच्या हातात 7 विकेट्स शिल्लक होत्या. मात्र, भारतीय संघाने खूपच खराब सुरुवात केली, ज्यानंतर संघाने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. तसेच, पहिल्या सत्रातच भारतीय संघाला सर्वबाद केले. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा चांगलाच ट्रोल झाला.

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर आता भारतीय चाहते रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यावर संतापले. सोशल मीडियावर चाहते रोहितला चांगलेच ट्रोल करत आहेत. चाहत्यांनुसार, आता रोहितने लवकरात लवकर भारतीय कर्णधारपद सोडले पाहिजे आणि त्याच्या जागी आगामी वनडे विश्वचषकात भारतीय संघाने इतर कोणत्यातरी खेळाडूला कर्णधार म्हणून निवडले पाहिजे.

एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “कर्णधारपद सांभाळू शकत नाही, फलंदाजी करू शकत नाही, क्षेत्ररक्षण करू शकत नाही, फिट राहू शकत नाही, रोहित शर्मा भारतीय संघाचा सर्वात मोठा चोकर आहे. जर वनडे विश्वचषक 2023 जिंकायचा असेल, तर रोहितला कर्णधारपदावरून हटवा.”

दुसऱ्या एकाने ट्वीट करत लिहिले की, “तू सर्व क्रिकेट प्रकारातील भारतीय संघाचा कर्णधार बनण्यापूर्वी आयुष्य खूप सुंदर होते.”

आणखी एकाने धक्कादायक ट्वीट करत लिहिले की, “जर तुला थोडीतरी लाज असेल, तर वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी कसोटी कर्णधारपद सोड.”

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील रोहितच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर के ओव्हल मैदानावर सामना बदलू शकणारी खेळी करू शकला नाही. भारतीय संघाच्या पहिल्या डावात रोहित 26 चेंडूत 15 धावाच करू शकला. त्यानंतर दुसऱ्या डावात रोहितने 60 चेंडूत 43 धावा केल्या. 444 आव्हानाचा पाठलाग करताना रोहित नेथन लायन याच्याविरुद्ध खराब शॉट खेळून बाद झाला, ज्यामुळे भारतीय दिग्गज खेळाडूही रोहितवर नाराज झाले.

विशेष म्हणजे, या सामन्यात फक्त रोहितच फ्लॉप ठरला नाही, तर शुबमन गिल (13, 18), विराट कोहली (14, 49), चेतेश्वर पुजारा (14, 27) आणि यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत (5, 23) यांनीही चाहत्यांना निराश केले. भारतीय संघाच्या फलंदाजांनी मोठ्या सामन्यात खूपच खराब प्रदर्शन केले, ज्यामुळे अंतिम सामना गमवावा लागला. (twitter reaction fans troll skipper rohit sharma after india defeat by australia wtc final 2023)

महत्वाच्या बातम्या-
डब्ल्यूटीसी फायनलमध्येही धोनीच कर्णधार पाहिजे होता! ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीती असेच म्हणाल
WTC Final । आयसीसी ट्रॉफीचा वनवास कायम! ऑस्ट्रेलियाकडून रोहितसेनेचा मानहानीकारक पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---