चेन्नई येथील सामन्याद्वारे भारत आणि इंग्लंड संघामधील बहुचर्चित चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी,पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर दबाव बनवलेला आहे.
या सर्व कठीण परिस्थितीत भारताच्या दुसऱ्या डावात अनुभवी फलंदाज रोहित शर्मा कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र रोहित स्वस्तात बाद झाला. रोहितच्या या खराब कामगिरीमुळे नेटकऱ्यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी रोहितला संघाबाहेर काढण्याची देखील मागणी केली.
दुसऱ्या डावातही ठरला अपयशी
शेवटच्या डावात 420 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने चांगली सुरुवात केली. त्याने जोफ्रा आर्चरच्या दोन सलग चेंडूवर चौकार व त्यांनतर षटकार ठोकला. रोहित आता मोठी खेळी खेळणार असे वाटत असतानाच जॅक लीचच्या एका अप्रतिम चेंडूवर तो बोल्ड झाला. रोहितने 20 चेंडूत 12 धावा केल्या.
रोहित कडून प्रचंड अपेक्षा असल्यामुळे त्याच्या बाद होण्याने अनेकांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली. रोहितला पहिल्या डावातही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. पहिल्या डावात तो ९ चेंडूत ६ धावा काढून माघारी परतला होता. त्यानंतर आता दुसऱ्या डावात संघासाठी त्याचे खेळपट्टीवर दीर्घकाळ टिकून राहणे महत्वाचे असताना तो स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे नेटकरी त्याच्यावर चांगलेच भडकलेले दिसले.
@bcci should really think of grooming of a youngster as opener with Gill…One more test match One more opportunity wasted for young players like Prithvi…Mayank…KL..Rohit is not a Test player…Respect him for what he did in White ball cricket @imVkohli @RaviShastriOfc
— Samip Rajguru (@samiprajguru) February 8, 2021
https://twitter.com/i_machu/status/1358743104325517312?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1358743104325517312%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Findia-vs-england-first-test-day-four-twitter-reactions
Apart from that one 50 in Australia.
Back to back 3 match failure for hitman.😔@BCCI @BCCIdomestic
Youngsters ko groom karo.👍Respect for him in white ball cricket but team needs to look forward? #Mayank #KLRahul #Shaw@StarSportsIndia #INDvENG #INDvsENG #EngvsInd #IndvsEng
— sanket Jawade (@sanketjawade143) February 8, 2021
Rohit Sharma falls again. He will again defend the shot choices #INDvsENG
— Ahem (@CMadaiah) February 8, 2021
दरम्यान चौथ्या दिवसाच्या समाप्ती नंतर भारताची धावसंख्या 1 बाद 39 झाली आहे. विजयासाठी पाचव्या दिवशी भारताला आणखी 381 धावांची आवश्यकता आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी सर्व क्रिकेट प्रेमींना भारतीय संघाकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : सहा गोलांच्या थरारात मुंबई सिटी-गोवा बरोबरी
म्हणून ट्विटरकरांना आली वीरेंद्र सेहवागची आठवण!
शाबास लंबू! ३०० विकेट्सचा पल्ला गाठणाऱ्या इशांत शर्माचे माजी खेळाडूंनी केले खास अंदाजात कौतुक