---Advertisement---

सुटला, सुटला.. हुश्श पकडला..! सर्वत्र रंगली दीपक हुडाच्या ‘सोडपकड’ कॅचची चर्चा

---Advertisement---

रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ हंगामातील त्यांचा दुसरा विजय नोंदवण्यात यशस्वी ठरला आहे. रविवारी (१८ एप्रिल) मुंबई येथे पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या हंगामातील अकराव्या सामन्यात त्यांनी ६ विकेट्सने बाजी मारली आहे. गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर सलामीवीर शिखर धवनच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर १८.२ षटकातच त्यांनी विजयी पताका झळकावली.

दरम्यान पंजाबचा धाकड फलंदाज दीपक हुडा याच्या अनोख्या पण शानदार क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले.

तर झाले असे की, पंजाबच्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांची सलामी जोडी मैदानावर चांगली रंगली होती. परंतु पंजाबचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने पृथ्वीला (३२ धावा) झेलबाद करत त्यांची जोडी तोडली. त्यानंतर अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ अवघ्या ९ धावांवरच झेलबाद झाला.

पुढे कर्णधार रिषभ पंतने बचावात्मक खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अशात झाय रिचर्डसनच्या डावातील १८ व्य़ा षटकात त्याने लॉन्ग ऑनवर एक खराब फटका मारला. तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभारलेल्या दीपक हुडाने सहज झेल पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु पहिल्यांदा त्याच्या हातून चेंडू निसटला. त्यानंतर एका हातातून दुसऱ्या हातात चेंडू खेळवत अखेर चौथ्या वेळी त्याने कसाबसा झेल टिपला.

https://twitter.com/SAHILHERE9/status/1383845424990097413?s=20

https://twitter.com/OrthodoxCricket/status/1383841020777943046?s=20

त्याच्या आगळ्यावेगळ्या सोड-पकड झेलची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी या झेलला आयपीएल २०२१ हंगामातील सर्वात विनोदी झेल, असे म्हटले आहे.

परंतु हुडाने झेल पकडल्यामुळे पंतच्या रुपात पंजाब संघाला मोठे यश मिळाले होते. तो १६ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १५ धावा करत तंबूत परतला होता. मात्र विजयासाठी अवघ्या १६ धावा शिल्लक होत्या आणि पंजाबच्या गोलंदाजांना अंतिम षटकात धावा रोखण्यात अपयश आल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘यंदा आयपीएल ट्रॉफी किंग कोहलीचं जिंकणार,’ इंग्लंडच्या माजी कर्णधाराला आहे विश्वास

क्या यही प्यार है? पतीचे यश पाहून धनश्री वर्माचे डोळे पाणावले, पाहा तो भावुक करणारा क्षण

“आगामी सामन्यात शमीला सलामीला पाठवा,” कर्णधार राहुलच्या रणनितीवर भडकला भारतीय दिग्गज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---