भारतीय संघाचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध 6 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेआधी भारताला मोठा धक्का बसला आहे.
या मालिकेआधी सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आॅस्ट्रेलिया एकादश विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या सराव सामन्यात भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ शुक्रवारी(30 नोव्हेंबर) दुखापतग्रस्त झाला आहे.
त्याला क्षेत्ररक्षण करताना बाउंड्री लाइनच्या जवळ मिड-विकेटला असताना झेल घेण्याच्या प्रयत्नात डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला लगेचच दवाखान्यात नेण्यात आले होते. त्याला मैदानातूनही भारतीय संघाच्या मेडिकल टीमने अक्षरश: उचलुन ड्रेसिंगरुममध्ये नेले होते.
त्यामुळे बीसीसीआयने माहिती दिली आहे की या दुखापतीमुळे शॉ 6 डिसेंबरपासून अॅडलेड येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
19 वर्षीय शॉने या सामन्यात पहिल्या डावात 69 चेंडूत 66 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्याचा हा फॉर्म पाहता त्याला पहिल्या कसोटीत सलामीला संधी मिळणार हे जवळजवळ पक्के होते. पण आता त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी सलामीला खेळण्यासाठी जागा रिकामी झाली आहे.
सलामीला खेळण्यासाठी भारताकडे केएल राहुल, मुरली विजय आणि रोहित शर्मा असे पर्याय आहेत. पण चाहत्यांनी दुखापतग्रस्त शॉच्या ऐवजी रोहित शर्माला संधी दिली जावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
I want Murali vijay and Rohit sharma will open innings ….will BCCI Announce Mayank agarwal as replacement?
— chandru suman (@chandhrusuman) November 30, 2018
@imVkohli please give one chance for Rohit Sharma as opener in test cricket .just try as this experiments
— Sudeepspoojary784 (@Sudeepspoojary2) November 30, 2018
https://twitter.com/TheFScott/status/1068409163418456065
I would eager to see @ImRo45 open for india
— Maulik barot (@007_mak) November 30, 2018
Then @ImRo45 should be given a chance to open the innings In Adelaide test
— Ahambrahmasmi™ (@VaibhavPawanist) November 30, 2018
India shd have try @ImRo45 as an opener at least for first test. We all know Adelaide is good track to bat on specially earlier in the innings. He might give good start to the team which is must in overseas toir. #AUSvsIND
— SYED IBRAHIM KHALEEL (@IAMSYEDKHALEEL) November 30, 2018
Mams @imVkohli lets try him @ImRo45 as opener for this test series..
Make this as possible!..#AUSvsIND
— ArJun (@BeingArJu) November 30, 2018
Now it’s very good opportunity for @ImRo45 to open in test match and show he is next @virendersehwag @BCCI #AUSvsIND #chhodnamat @SonyLIV @KentCricket @sanjaymanjrekar
— MANish GOyal 🥭 (@cacsmango) November 30, 2018
पण सराव सामना पाहता भारतीय संघ व्यवस्थापन केएल राहुल आणि मुरली विजयचा सलामी जोडी म्हणून तर रोहितला मधल्या फळीत खेळवण्याचा विचार करण्याची शक्यता आहे. कारण राहुलला सराव सामन्यातील दोन्ही डावात सलामीला खेळण्याची संधी मिळाली आहे. तसेच विजयनेही दुसऱ्या डावात सलामीला फलंदाजी केली आहे.
राहुलला पहिल्या डावात 3 धावाच करता आल्या. पण दुसऱ्या डावात त्याने 62 धावांची खेळी केली आहे. तर विजयने दुसऱ्या डावात मिळालेल्या संधीचे सोने करत 129 धावांची शतकी खेळी केली आहे. तसेच रोहितने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पहिल्या डावात 40 धावा केल्या होत्या. या सामना अनिर्णित राहिला आहे.
रोहितने जवळजवळ 10 महिन्यांनतर भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केले आहे. तो भारताकडून शेवटचा कसोटी सामना जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आहे.
त्याचबरोबर रोहित 2013 पासून भारताकडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करतो. मात्र त्याने एकदाही कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी केलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
–क्रिकेट क्रिकेटसारखच खेळा, जोशात प्रामाणिकपणा सोडू नका
–हुंदळेवाडीचा वाघ… सिद्धार्थ देसाई
–हॉकी विश्वचषक २०१८: पाॅकेटमनी खर्च करुन तो संघ आलाय भारतात
–शंभर टक्के! तुम्ही असा स्कोअरबोर्ड कधी पाहिला नसेल
–आज सचिनबरोबर १२ खेळाडूंनी केले होते एकाच सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण