देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या कहर केला आहे. दैनंदिन रुग्णवाढ कमी होण्याची चिन्हे नसून मृत्यूंची संख्या देखील वाढतेच आहे. गेली वर्षभर या विषाणूशी झुंजत असल्याने आता आरोग्य व्यवस्था देखील अपुरी पडत चालली आहे. देशातील अनेक कुटुंबांनी या महामारीत आपल्या आप्तस्वकीयांना गमावले आहे.
क्रीडा क्षेत्र देखील याला अपवाद नाही. अनेक खेळाडू कोरोना संक्रमित झाले आहेत. तर काहींना यात आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. यातच भारताच्या क्रिकेट क्षेत्रासाठी एक वाईट बातमी समोर येते आहे. गेल्या दोन दिवसात दोन माजी क्रिकेटपटूंचे निधन झाले आहे. यामुळे भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सौराष्ट्राच्या संघाकडून खेळणारे माजी क्रिकेटपटू प्रभुभाई परमार यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ७६ वर्षांचे होते. १९६८-६९ च्या काळात त्यांनी सौराष्ट्राच्या संघाकडून चार रणजी सामने खेळले होते. त्यांच्या निधनापूर्वी एक दिवा आधी त्यांच्या पत्नीचे देखील निधन झाले होते. परमार यांच्या निधनावर बीसीसीआयचे सचिव निरंजन शहा यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
याआधी एका दिवसापूर्वी मुंबईच्या माजी खेळाडू आणि स्कोरर रंजिता राणे यांचे देखील निधन झाले होते. कॅन्सरशी चाललेली त्यांची झुंज अपयशी ठरल्याने त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार गेल्या एका पंधरवड्यापासून त्या दवाखान्यात भरती होत्या. रंजिता राणे या एक कुशल स्कोरर म्हणून ओळखल्या जायच्या. अष्टपैलू खेळाडू असलेल्या रंजिता यांनी १९९५ ते २००३ या काळात मुंबईकडून ४४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.
त्यामुळे आता लागोपाठ दोन दिवसात दोन माजी क्रिकेटपटू हरपल्याने भारतीय क्रिकेट विश्वात हळहळ निर्माण झाली आहे. अनेकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता!! अजिंक्य रहाणेला भर गर्दीत चाहत्याने केले होते कीस, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
चहलने बॅट मागितल्यावर सूर्यकुमारने उडविली खिल्ली, म्हणाला “तू इतका बारीक आहेस की…”
धोनी तो धोनीच !! इंग्लंडला जाण्यापूर्वी ‘या’ खेळाडूने खास फोटो पोस्ट करत काढली माहीची आठवण