सध्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेेच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार पॅट कमींस दुखापतग्रस्त झाला, ज्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याला तो मुकणार आहे. ऍडिलेेडमध्येे वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या डे-नाईट कसोटी सामन्याच्या आधी ऑस्ट्रेलिया संघात दोन नव्या वेगवान गोलंदाजांना सामील करण्यात आलेे. या दोन वेगवान गोलंदाजांमध्ये लॉन्स मॉरिस आणि मायकल नीसर यांचा समावेश आहे.
मायकल नीसर (Michael Neser) याबद्दल बोलायच झाला तर त्याने मागच्या वर्षी ऍडिलेड येथे इंग्लंड विरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. तसेच लॉन्स मॉरीस (Lance Morris) याने अद्याप आपले पदार्पण केलेले नाही. त्याने बिग बॅश लीगच्या 2019-20च्या हंगामात मेलबर्न स्टार्स संघासाठी धमाकेदार प्रदर्शन केले होते. त्यानंतर मॉरीसने 2021-22च्या शेफिल्ड शील्डमध्ये पदार्पण करत 20 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचा हा हंगाम अधिक चांगला राहिला आणि त्याने 5 सामन्यात 18.40च्या सरासरीनेे 27 विकेट्स घेतल्या.
निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेेली (George Bailey) यांनी या दोन गोलंदाजांच्या निवडीबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,” मायकल नीसर (Michael Neser) याआधी देखील ऑस्ट्रेलियन संघाचा भाग राहिला आहे. मागच्या वर्षी ऍडिलेड कसोटी सामन्यात त्याने चांगले प्रदर्शन केले होते. त्याचेे अतिशय उत्साही पद्धतीने संघात स्वागत केेले जाईल. लॉन्स ही आणखी एक युवा वेगवान गोलंदाज आहेे, ज्याने स्वत:ला सिद्ध केले. त्याच्या गोलंदाजीत वेग आहे आणि तो विकेट्स घेण्यासाठी ओळखला जातो. अशा वातावरणात येणे हा त्याच्यासाठी चांगला अनुभव असणार आहे.”(Two new fast bowlers have selected for adeilade day and night test)
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ
ऑस्ट्रेलियाने पर्थ येथे खेळलेला पहिला कसोटी सामना जिंकला आहे आणि आता ऍडिलेडमध्ये दुसरा डे-नाईट कसोटी सामना ऍडिलेड येथे खेळवला जाईल. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ खालीलप्रमाणे आहे.
पॅट कमींस, स्कॉट बोलॅंड, ऍलेक्स कॅरी, कॅमेरुन ग्रीन, मार्कस हॅरीस, डेविड वॉर्नर, मायकल नीरस, लॉन्स मॉरिस,जोश हेजलवुड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, नॅथम ल्यॉन, स्टीव स्मिथ
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रीय संघाकडून सुट्टी मिळाली असताना सूर्यकुमार डॉमेस्टिकमध्ये करणार धमाका, एमसीए अधिकाऱ्याची माहिती
विश्वचषकासाठी ‘हा’ खेळाडू प्रबळ दावेदार, दिनेश कार्तिकने व्यक्त केले मत