fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

हे आहे जगातील ५ महान क्रिकेटपटू, यात दोन आहेत भारतीय

पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजने सर्वकालीन पाच सर्वश्रेष्ठ फलदाजांची नावे सांगितले आहेत. यामध्ये २ भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान संघातून प्रत्येकी एक खेळाडू घेतला आहे. तसेच दक्षिण आफ्रिका संघातूनही एका फलंदाजाची निवड केली आहे.

ट्विटरवर चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना हाफीजने या नावांचा उल्लेख केला आहे.

यावेळी हाफिजने सांगितले की, वेस्टइंडीज संघाचा दिग्गज खेळाडू ब्रायन लारा (Brian Lara), भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे खेळाडू अव्वल पाच सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक आहेत. या खेळाडूंबरोबरच पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज सईद अन्वर (Saeed Anwar) आणि दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सचाही (AB De Villiers) यामध्ये समावेश आहे.

या यादीत सचिन, लारा आणि विराटने वनडे क्रिकेटमध्ये १०००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या यादीत विराट हा एकमेव असा फलंदाज आहे जो अजूनही क्रिकेट खेळत आहे. इतर चार फलंदाजांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

अन्वरने २४७ सामन्यांमध्ये ३९.२१ च्या सरासरीने ८८२४ धावा केल्या आहेत. तसेच डिविलियर्सने २२८ वनडे सामन्यांमध्ये ५३.५० च्या सरासरीने ९५७७ धावा केल्या आहेत. १०००० धावांच्या अगदी जवळ गेल्यानंतर अन्वर आणि डिविलियर्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

विशेष म्हणजे हाफीजने पाकिस्तानचा उत्कृष्ट फलंदाज बाबर आझमच्या (Babar Azam) नावाचा उल्लेख केलेला नाही.

बाबरची आणि विराटची तुलना अनेक वेळा करण्यात आली आहे. तसं पाहिलं तर सामने आणि अनुभवाच्या दृष्टीने आझम विराटपासून बराच मागे आहे. कदाचित त्यामुळेच हाफीजने बाबरला या यादीत स्थान दिले नाही.

ट्रेंडिंग घडामोडी-

-कोरोनामुळे घरात बसलाय, हे स्पोर्ट्सवरील ५ सिनेमे नक्की पहा

-वैतागलेला चहल म्हणतो, मुंबई इंडियन्स, तुम्ही स्वप्न पाहत बसा

-आणि एमएस धोनी पुन्हा झाला कर्णधार

You might also like