जयपूर-राजस्थान येथे ६७ वि वरीष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पार पडली. (67th Senior National Kabaddi Championship ) यास्पर्धेत भारतीय रेल्वेच्या दोन्ही संघांनी विजेतेपद कायम राखत आपले वर्चस्व प्रस्थापित ठेवले. एकेएफआय च्या मान्यतेने राजस्थान राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित राष्ट्रीय स्पर्धा २ मार्च ते ६ मार्च २०२० दरम्यान पौर्णिमा युनिव्हर्सिटीच्या मैदानात पार पडली. महाराष्ट्राच्या पुरुष संघातील २ खेळाडूंची संभाव्य यादी मध्ये निवड करण्यात आली आहे.
पुरुष विभागात भारतीय रेल्वेने सेनादल वर विजय मिळवत विजेतेपद पटकावले. पुरुष संघाच्या निवडीसाठी रामबीर सिंग खोखर, के सि सुतार व इ भास्करान यांनी काम केलं. निवड समितीने सदर स्पर्धेतून ३६ जणांची निवड संभाव्य भारतीय संघात निवड आहे. तर २ खेळाडूंना राखीव ठेवले आहे.
पुरुष विभागात भारतीय रेल्वेचे ६ तर सेनादलचे ५ खेळाडूंचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येकी २ खेळाडूंचा समावेश आहे. संपुर्ण स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून चढाईत सर्वाधिक गुण मिळवणारा पंकज मोहिते (Pankaj Mohite), तर महाराष्ट्रा कडून सर्वाधिक पकडी करणाऱ्या शुभम शिंदेची (Shubham Shinde) संभाव्य ३६ खेळाडूंमध्ये निवड झाली आहे.