दिल्ली | काल दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात दिल्ली डेअरडेविल्सने तब्बल ५५ धावांनी विजय मिळवला. दिल्ली डेअरडेविल्स नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावार त्यांनी हा विजय मिळवला.
अय्यरने काल ४० चेंडूत १० षटकार आणि ३ चौकारांच्या सहाय्याने नाबाद ९३ धावा केल्या. यामुळे दिल्लीला २० षटकांत ४ बाद २१९ धावा करता आल्या. तर कोलकाता संघाला २० षटकांत ९ बाद १६४ धावा करता आल्या.
या सामन्यात आणखी एका खेळाडूने चांगली कामगिरी केली. तो खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून मुंबई रणजी संघातील सहकारी आणि दिल्ली डेअरडेविल्सचा सलामीवीर पृथ्वी शाॅ.
शाॅने काल ४४ चेंडूत ६२ धावा करताना ७ चौकार आणि २ षटकार खेचले. याबरोबर त्याने काही खास विक्रमही केले. त्यातील काही ठळक विक्रम-
-दुसरा सामना: केवळ दुसऱ्या आयपीएल सामन्यात पृथ्वी शाॅ अर्धशतकी केली.
-१८ वर्ष १६९ दिवस: आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम, संजू सॅमसनसह या विक्रमात अव्वल स्थानी. सॅमसननेही२०१३मध्ये १८ वर्ष १६९ दिवसांचे असताना आय़पीएलमध्ये अर्धशतक केले होते.
४२- केवळ दोन आयपीएल सामने खेळणाऱ्या पृथ्वी शाॅची आय़पीएलमधील सरासरी.
४ था- १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकत आयपीएल खेळणारा पृथ्वी शाॅ केवळ चौथा कर्णधार. मोहम्मद कैफ (२००२), विराट कोहली (२००८) आणि उन्मुक्त चंद यांनी यापुर्वी ही कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–IPL 2018: आव्हान राखण्यासाठी मुंबईला आजचा विजय महत्त्वाचा
–Video: पहा सचिन तेंडूलकर, एमएस धोनीपोठीपाठ मुंबईकर पृथ्वी शॉचा हेलिकॉप्टर शॉट!
–कॅप्टन म्हणून खेळला पहिलाच सामना, परंतू विक्रमांचा केला महा धमाका
–भारत पाकिस्तान सामन्यासाठी असे आहेत तिकीटांचे दर
–पहा व्हिडीओ- सिक्सर किंग जेव्हा आजमावतो स्टंपमागे नशीब