भारताला १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून देणाऱ्या पृथ्वी शॉच्या टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता त्यात आणखी एक भर पडली आहे ती मुंबई क्रिकेट असोशिएशनची.
मुंबई क्रिकेट असोशिएशनने आपल्या या लाडक्या खेळाडूला तब्बल २५ लाख रुपये देऊन सन्मानित करायचे ठरवले आहे.
याबद्दलचे अधिकृत ट्विट असोशिएशनचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहेत.
“विश्वकप विजेत्या भारतीय संघाचा कप्तान मुंबईकर पृथ्वी शाॅ याला मुंबई क्रिकेट एसोसिएशन तर्फे 25 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करताना मला अत्यंत आनंद होतो आहे. संपूर्ण संघाचे ही मनापासुन अभिनंदन!” असे शेलार यांनी म्हटले आहे.
विश्वकप विजेत्या भारतीय संघाचा कप्तान मुंबईकर पृथ्वी शाॅ याला मुंबई क्रिकेट एसोसिएशन तर्फे 25 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करताना मला अत्यंत आनंद होतो आहे. संपूर्ण संघाचे ही मनापासुन अभिनंदन!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 3, 2018
World Champions – once again ! Congratulations 2 our U19 cricket team for a masterly performance, #PrithviShaw made Mumbai proud 2day !
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 3, 2018
बीसीसीआयने यापूर्वीच प्रत्येक खेळाडूला ३० लाखांच्या बक्षिसांची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईकर स्टार पृथ्वी शॉला एमसीए आणि बीसीसीआयकडून आता एकूण ५० लाखांचे बक्षीस मिळणार आहे.






