---Advertisement---

१६ वर्षांखालील कुमार हॉकी यजमान एसएनबीपीची उपांत्य फेरीत हार

On: गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022 7:31 PM
---Advertisement---

पुणे : शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (SGPC), अमृतसर आणि नवोदित ध्यानचंद अकादमी संघां दरम्यान अंतिम सामना रंगेल. उपांत्य फेरीत निर्विवाद वर्चस्वासह या संघांनी विजय मिळविला. अंतिम सामना उद्या शुक्रवारी म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे.

दुसऱ्या उपांत्य लढतीत ध्यानचंद अकादमी संघाने यजमान एसएनबीपी संघाचा अगदीच एकतर्फी सामन्यात ७-१ असा पराभव केला. एसएनबीपी संघ गेल्या वर्षी तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. अरबाजने नोंदविलेली हॅटट्रिक ध्यानचंद अकादमीच्या विजयात निर्णायक ठरली. विशाल पांडे, अरुण, आकाश पाल , महेश्वर प्रसाद यांनी एकेक गोल करून त्याला साथ केली.

पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर मोहम्मद शाहिदने गोल करून एसएनबीपीला झकास सुरवात करून दिली. मात्र, त्यानंतर त्यांना ध्यानचंद अकादमीच्या वेगवान चाली आणि आक्रमक खेळाचा सामना करता आला नाही.

पहिल्या उपांत्य फेरीत, २०१९ मध्ये उपविजेते ठरलेल्या एसजीपीसी संघाने अन्वर हॉकी सोसायटीचा ४-३ असा पराभव केला.

गुरकिरत सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अन्वर हॉकी सोसायटीसाठी शाहरुख अलीने चौथ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून आक्रमक सुरुवात केली. अर्षदीप सिंगने एसजीपीसीला बरोबरी साधून दिली.
कमालीच्या वेगवान झालेल्या सामन्यात शाहरुखने पुन्हा एकदा अन्वर हॉकी सोसायटीला आगाडीवर नेले. मात्र, त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. अर्षदीपनेच गोल करून सामन्यात पुन्हा २-२ अशी बरोबरी आणली.
उत्तरार्धात साहिबप्रीत सिंगने एसजीबीसीला प्रथमच आघाडीवर नेले. घेण्यास भाग पाडले. अर्थात, त्यांचा आनंदही फारकाळ टिकला नाही. केतन कुशवाहने सामन्यात ३-३ अशी बरोबरी आणली. सामन्यात तिसऱ्यांदा बरोबरी राहिली होती. अखेरीस गुरकीरतने ‘स्ट्रोक’वर गोल करून एसजीपीसी संघाचा विजय साकार केला.

निकाल –

उपांत्य फेरी १ – शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (SGPC), अमृतसर : ४ (अर्शदीप सिंग १८, २३वे मिनिट, साहिबप्रीत सिंग ४३वे मिनिट, गुरकिरत सिंग ५१वे मिनिट) वि.वि. अन्वर हॉकी सोसायटी : ३ (शाहरुख अली ४थे, १९वे मिनिट, केतन कुशवाह ४८वे मिनिट)
मध्यंतर २-२

उपांत्य फेरी २- ध्यानचंद अकादमी : ७(विशाल पांडे ६वे मिनिट, अरुण २३वे मिनिट, आकाश पाल २७वे मिनिट, अरबाज २८, ३३, ४०वे मिनिट, महेश्वर प्रसाद ४३वे मिनिट) वि.वि. एसएनबीपीअकादमी : १(मोहम्मद शाहिद पहिले मिनिट). मध्यंतर १-१

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा माझे आदर्श’, पहिल्या वनडेपूर्वीच खेळाडूचे मोठे वक्तव्य
पांढरे केस, पांढरे जॅकेट अन् हातात माईक, रिची बेनो बोलायला लागले की, ऐकणाऱ्याचे कान व्हायचे तृप्त

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---