वेस्ट इंडिजमध्ये सध्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा सुरु असून शनिवारी (२२ जानेवारी) ब गटातील शेवटच्या सामन्यात भारताला युगांडाचा सामना करायचा आहे. पण या सामन्यात भारतीय संघ कर्णधार यश धुलसह ५ भारतीय खेळाडूशिवाय उतरणार आहे. या खेळाडूंची कोविड १९ आरटी-पीसीआर चाचणी काही दिवसांपूर्वी पाॅझिटिव्ह आली होती. यामुळे हे भारतीय खेळाडू १९ वर्षाखालील विश्वचषकात युगांडाविरुद्धच्या संघाच्या शेवटच्या सामन्यातून बाहेर पडले आहेत.
बुधवारी (१९ जानेवारी) आयर्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी आयसोलेशनमध्ये गेलेल्या ६ खेळाडूंपैकी अष्टपैलू असणाऱ्या वासु वत्सचा कोरोना अहवाल नकारात्मक आला आहे. भारतीय १९ वर्षांखालील संघ आधीच उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे.
कर्णधार यश धुल, आराध्य यादव, शेख रशीद या खेळाडूंची रॅपिड अँटीजेन चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. तसेच आरटी-पीसीआर चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. आरएटीमध्ये निगेटीव्ह आलेल्या मानव पारखच्या आरटीपीसीआर चाचणीचा निकाल पाॅझिटिव्ह आला आहे. आयसीसीच्या एका सुत्राने सांगितले आहे की, “या चाचणीच्या निकालाची सकारात्मक आणि बाब म्हणजे आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात जे खेळाडू मैदानात उतरले होते, त्या ११ खेळाडूंचे चाचणीचे निकाल नकारात्मक आले आहेत.”
भारताने त्यांच्या संघात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कठीण परिस्थीतीत मैदानात उतरवल्यानंतर आयर्लंडविरुद्ध मोठा विजय मिळवून बाद फेरीमध्ये स्थान निश्चित केले आहे. स्पर्धेच्या नियमानुसार, सर्व बाधित खेळाडूंना पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. या कालावधीत तपासात तीन वेळा निगेटिव्ह आल्यानंतरच त्या खेळाडूला संघात समाविष्ट केले जाणार आहे. दरम्यान बायो-बबलमध्ये राहूनसुद्धा भारतीय खेळाडू कोरोना व्हायरसला बळी कसे पडले, याबाबत साशंकता आहे.
भारतीय संघ यूएईमध्ये आशिया कप जिंकल्यानंतर ऍमस्टरडॅममार्गे वेस्ट इंडिजला रवाना झाला. गयानामध्ये पोहोचल्यानंतर भारतीय संघाला पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागले आणि यादरम्यान संघाच्या एका सहकाऱ्याच्या कोरोना चाचणीचा निकाल सकारात्मक आला. प्रवासादरम्यान या सदस्याला विषाणूची लागण झाली, त्यामुळेचं इतर खेळाडूंना संसर्ग झाला असावा, असे मानले जातं आहे.
आरटीपीसीआर चाचणीचा निकाल दोन दिवसांनी येतो आणि पाचव्या दिवशी आयसोलेशनमधून आल्यानंतर भारतीय खेळाडू दोन दिवस प्रशिक्षक संघाच्या पॉसिटीव्ह आलेल्या सदस्याच्या संपर्कात होते.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार बदलला पण रिझल्ट तोच! बाह्यदेशात वनडे मालिकेत सपाटून मार खाण्याची परंपरा कायम, पाहा यादी
आयपीएल २०२२: अजूनही तीन संघ ‘सेनापती’च्या शोधात; ‘हे’ तिघे शर्यतीत आघाडीवर
मुंबई-पुणे भूषवणार आयपीएल २०२२ चे यजमानपद? ‘या’ दिवशी होऊ शकतो शुभारंभ