अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. अशातच अंतिम सामन्याच्याआधी भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 19 वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारनची स्तुती केली आहे. तर, भारतीय सघाने उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा संघाने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.
याबरोबरच, सेमी फायनलमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर युवा भारतीय संघाची अवस्था 4 बाद 32 धावा अशी झाली असताना उदय सहारन आणि सचिन धस यांनी दमदार भागीदारी रचत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
तसेच, भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला कर्णधार उदय सहारनची ही खेळी चांगलीच आवडली असून त्याने उदय सहारनची तुलना भारतीय संघातील मॅच फिनिशरशी केली आहे. तर, रविचंद्रन अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, ‘अनेक लोकं यंदाच्या वर्ल्डकपमध्ये उदय सहारनच्या रूपाने भारताला पुढचा सुपर स्टार मिळाला आहे. अशी चर्चा रविचंद्रन अश्विनने केली आहे.
आतापर्यंत उदय सहारनने यंदाच्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपध्ये सहा सामन्यात 389 धावा केल्या आहेत. तर त्याची सरासरी ही 64.83 असून त्याने तीन अर्धशतक आणि एक शतक झळकावले आहे. याबरोबरच,सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सहारनने 81 धावांची दमदार खेळी केली. या खेळीमुळे भारताला विजय मिळवता आला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-19 संघाविरुद्ध विजय नोंदवल्यानंतर भारतीय कर्णधार उदय सहारनने सामन्यानंतरच्या सादरीकरणात एक मोठे विधान केले आणि म्हणाला की, माझ्यावर कोणत्याही वेळी दबाव आला नाही. होय, एकेकाळी आपण खूप मागे होतो. पण शेवटपर्यंत लढायचे होते. भागीदारीचा मुद्दा होता. पण मला हे माझ्या वडिलांकडून मिळाले आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया एकेकाळी अत्यंत कठीण परिस्थितीत होती. भारतीय संघाने 32 धावांत चार विकेट गमावल्या होत्या, मात्र यानंतर कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांनी स्फोटक खेळी खेळली होती. तर या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी केली होती.
महत्वाच्या बातम्या –
सौरव गांगुलीचा महागडा मोबाईल घरातून चोरी! माजी दिग्गजाचे मोठे नुकसात, पोलिसांकडे तक्रार दाखल