ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडले गेले. 16 ऑक्टोबरला पहिल्या फेरीत गट अमधील युएई विरुद्ध नेदरलॅंड्स सामना खेळला गेला. जिलाँगच्या सायमंड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात युनायटेड अरब अमिरातीच्या एका खेळाडूने टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील मोठा विक्रम तोडला आहे. त्या खेळाडूचा हा पहिलाच टी20 विश्वचषक असून त्याने मैदानावर पाऊल ठेवताच पाकिस्तानचा मोहम्मद आमीर याचा विक्रम तुटला.
युएईचा अष्टपैलू अयान अफजल खान (Aayan Afzal Khan) याने नेदरलॅंड्स विरुद्ध खेळताना टी20 विश्वचषकातील सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे. त्याच्या या विक्रमानंतर त्याची आई शाहिस्ता खान याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तसेच त्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर (Mohammed Amir) याचा विक्रम मोडला आहे. आतापर्यंत टी20 विश्वचषकात सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू म्हणून खेळण्याच्या विक्रम आमीरच्यानावावर होता.
अयान केवळ तीन वर्षाचा होता जेव्हा आमीरने 2009च्या टी20 विश्वचषकात वयाच्या 17व्या वर्षी खेळण्याचा विक्रम केला. तो युएईसाठी खेळत असला तरी त्याचे वडील भारताच्या गोव्यासाठी स्थानिक क्रिकेट खेळले आहेत. त्यांनीच अयानला क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले.
अयानने याचवर्षी घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. यामध्ये त्याने 3 सामन्यात 4 विकेट्स घेत 30 धावाही केल्या होत्या.
अयानने टी20 विश्वचषकामध्ये नेदरलॅंड्स विरुद्ध 5 धावा केल्या. तसेच त्याने 3 षटके टाकत 15 धावा दिल्या आणि एक विकेटही घेतली. या सामन्यात युएईने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 118 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलॅंड्सने 19.5 षटकात 7 विकेट्स गमावत सामना जिंकला.
Aayan Afzal Khan – the first 16 year old in men's T20 World Cup history 👶
He was born after the 2005 Ashes ended 🤯#T20WorldCup2022 pic.twitter.com/Byn72U0rhn
— Wisden (@WisdenCricket) October 16, 2022
टी20 विश्वचषक खेळणारे सर्वात युवा पुरूष खेळाडू
16 वर्ष 335 दिवस – अयान अफजल खान , युएई (2022*)
17 वर्ष 55 दिवस – मोहम्मद आमीर , पाकिस्तान (2009)
17 वर्ष 170 दिवस – राशिद खान, अफगाणिस्तान (2016)
17 वर्ष 196 दिवस – अहमद खान, पाकिस्तान (2009)
17 वर्ष 282 दिवस – जॉर्ज डॉकरेल, आयर्लंड (2010)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला फिट बनवणाऱ्या ट्रेनरने सांगितला विराट-धोनीचा ‘फिटनेस मंत्रा’; तुम्हीही जाणून घ्या
वॉर्म-अप सामन्यात सूर्या-राहुलची तुफानी खेळी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने केल्या 186 धावा