---Advertisement---

सुरू असलेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये क्रिकेट बोर्डाची खेळाडूवर कडक कारवाई, सलामीवीराची थेट घरीच रवानगी

On: मंगळवार, फेब्रुवारी 10, 2026 11:45 AM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (मंगळवार, १० फेब्रुवारी) तीन सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना नामिबिया विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात खेळला जात असून दुपारी तीन वाजता न्यूझीलंड विरुद्ध यूएई सामना आहे. हा सामना चेन्नईमध्ये खेळला जाणार असून यूएईने (यूनाईटेड अरब अमिराती) त्यांच्या एका खेळाडूला थेट घरी परत पाठवले आहे.

अमिराती क्रिकेट बोर्डने सलामीवीर फलंदाज मोहम्मद जोहैबला अनुशासन संबंधित कारणासाठी संघातून बाहेर केले आहे. त्याबाबत यूएईने ९ फेब्रुवारीला एक विधान केले आहे. ज्यामध्ये त्यांनी मोहम्मद प्रकरणाबद्दलची सर्व माहिती वेळ आल्यावर सांगितली जाईल, असे म्हटले आहे.

जोहैबच्या जाण्याने यूएईच्या फलंदाजीवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच त्याच्या अनुपस्थितीत कर्णधार मोहम्मद वसीम आर्यांश शर्मासोबत सलामीला येईल. जोहैबने २०२५मध्ये यूएईसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत १६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १०३.७६च्या स्ट्राईक रेटने ३०३ धावा केल्या असून एक अर्धशतकही केले.

टी२०मध्ये न्यूझीलंड-यूएई आज चौथ्यांदा समोरा-समोर येणार आहेत. २०२३मध्ये न्यूझीलंडने यूएईविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली होती. त्यात न्यूझीलंड २-१ असा जिंकला होता. तो एक सामना यूएईने ७ विकेट्सने जिंकला होता.

न्यूझीलंडविरुद्धच्या प्रदर्शनाबाबत वसीम म्हणाला, “मागे काहीही झालेले असो. सध्या देश वेगळा असून ठिकाणही वेगळे आहे. स्पर्धाही मोठी असून परिस्थिती बदलेली आहे. यामुळे आम्ही वेगळ्या नियोजनाने उतरणार आणि सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.”

यूएईचा हा या स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. यामुळे विजयाची सुरूवात करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार. दुसरीकडे न्यूझीलंडचा हा दुसरा सामना आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला ५ विकेट्सने पराभूत केले आहे.

यूएईने ओमानमध्ये झालेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक आशिया आणि ईस्ट आशिया पॅसिफिक क्वालिफायरमध्ये जपानला पराभूत करत सुरू असलेल्या विश्वचषकासाठी पात्र ठरले. त्यांनी २०१२ आणि २०२२मध्ये टी२० विश्वचषक खेळला आहे. यामध्ये त्यांना ग्रुप स्टेजपर्यंतच समाधान मानावे लागले.

या स्पर्धेत त्यांना कॅनडाशी १३ फेब्रुवारी, अफगाणिस्तानशी १६ फेब्रुवारी आणि दक्षिण आफ्रिकेशी १८ फेब्रुवारीला खेळायचे आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---