आयपीएल २०२१ चा १४ वा हंगाम खेळाडूंना झालेल्या कोरोना संक्रमनामुळे अर्ध्यातून थांबवला गेला होता. आता त्याच हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार आहेत. हा निर्णय भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ (BCCI) आणि अमीरात क्रिकेट बोर्डाने (ECB) एकत्र विचार करून घेतला आहे. त्यांनी उर्वरित सामन्यांसाठी मैदानात ६० % प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी दिली गेली आहे.
आयपीएल २०२१ च्या १४ व्या हंगामाचे आयोजन यापूर्वी भारतात करण्यात आले होते. भारतातील कोरोनाच्या वाढत चाललेला दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन बीसीसीआयला काही कठोर निर्णय घ्यावे लागले होते. कडक निर्बंधांचे पालन करूनही स्पर्धेदरम्यान काही खेळाडूंना कोरोनाचे संक्रमन झाले होते. याच कारणामुळे आयपीएलचा १४ वा हंगाम मे महिन्यात स्थगित करण्याच आला होता.
युएईमध्ये झालेल्या २०२० च्या आयपीएल हंगामात आणि २०२१ च्या भारतात आयोजित केलेल्या हंगामातही प्रक्षकांना स्टेडियमवर सामने पाहण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, २०२१ च्या हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी यूएईमध्ये ६० % प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये पुन्हा सुरू होणार आहेत. यूएईमध्ये पहिला सामना दुबई येथे १९ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. त्यानंतरचा सामना अबू धाबी येथे कोलकाता नाइट रायडर्स आणि राॅयल चॅलेंजर्स बॅंगलोर यांच्यात होणार आहे. तर शारजाहवरचा पहिला सामना २४ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ भिडणार आहेत.
यूएईमध्ये एकूण आयपीएलचे ३१ सामने खेळवले जाणार आहेत. हंगामाचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला होईल. यूएईमध्ये अबू धाबी, दुबई आणि शारजाह या तीन ठिकाणी सामन्यांचे आयोजन केले गेले आहे. एकूण १३ सामने दुबईमध्ये, १० शारजाहमध्ये आणि ८ अबू धाबीमध्ये खेळले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
युएईत आयपीएल खेळण्यास पाँटिंगचे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना समर्थन, उद्देश आहे खूप मोठा
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू पुन्हा उतरणार मैदानात; टी२० विश्वचषकात ‘या’ संघाचे करणार प्रतिनिधित्व