---Advertisement---

आशिया कपसाठी यूएईचा स्क्वाड जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

On: गुरूवार, सप्टेंबर 4, 2025 5:26 PM
---Advertisement---

आशिया कपसाठी आठव्या आणि शेवटच्या संघानेही आपला संघ जाहीर केला आहे. संयुक्त अरब अमिरातने (UAE) 17 सदस्यीय संघ जाहीर केला असून, संघाची धुरा मोहम्मद वसीम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आशिया कपची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार असून, यूएई आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला भारताविरुद्ध खेळणार आहे. (Asia Cup India vs UAE Match Date). वसीम पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या तिरंगी मालिकेतही यूएई संघाचे नेतृत्व करत होते.

ट्राय सीरिजमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना आशिया कपच्या संघात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर मतीउल्लाह खान आणि सिमरनजीत सिंह या दोन नवीन खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. मतीउल्लाह खान यंदाच्या मे महिन्यानंतर पुन्हा यूएई संघात पुनरागमन करणार आहेत, तर सिमरनजीत सिंह यांनी डिसेंबर 2024 मध्ये शेवटचा सामना यूएईकडून खेळला होता.

आशिया कपसाठी यूएईचा संघ: मोहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, आर्यांश शर्मा (यष्टिरक्षक), आसिफ खान, ध्रुव पाराशर, एथन डिसूजा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतीउल्लाह खान, मोहम्मद फारूक, मोहम्मद जवादुल्लाह, मोहम्मद जोहेब, राहुल चोप्रा (यष्टिरक्षक), रोहिद खान, सिमरनजीत सिंह आणि सगीर खान.

यूएईने आतापर्यंत तीन वेळा आशिया कपमध्ये सहभाग घेतला आहे, पण 2016 नंतर त्याने या स्पर्धेत कधीच भाग घेतलेला नाही. आशिया कप 2025 ची यजमानी बीसीसीआयकडे असली तरी, पाकिस्तानविरुद्ध तटस्थ ठिकाणी खेळण्याच्या कारणास्तव बीसीसीआयने हा स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यास संमती दिली होती.

यूएईबाबत बोलायचे झाले तर त्याला आशिया कप 2025 मध्ये भारत, पाकिस्तान आणि ओमान यांच्यासोबत गट अ मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचा पहिला सामना 10 सप्टेंबरला भारताविरुद्ध, 15 सप्टेंबरला ओमानविरुद्ध आणि 17 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---