आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी टी-२० लीग आधीच अडचणीची ठरली आहे. दरम्यान, पुढील वर्षीपासून यूएईमध्ये नवीन टी-२० लीग सुरू होणार आहे. यात ६ संघांचा समावेश आहे. यामध्ये अव्वल खेळाडूला जास्तीत जास्त ४ लाख ५० हजार यूएस डॉलर म्हणजेच सुमारे ३.५८ कोटी रुपये मिळतील. आयपीएलनंतर लीगमधील खेळाडूला दिले जाणारे हे सर्वाधिक पगार आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया संकटात सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर घरगुती बिग बॅश लीगऐवजी यूएईमध्ये होणाऱ्या टी-२० लीगमध्ये खेळताना दिसू शकतो.
युएई टी२० लीगचे सामने जानेवारी २०२३मध्ये होणार आहेत. ६ जानेवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान ६ संघांमध्ये ३४ सामने खेळवले जातील. प्रत्येक संघ दोनदा विरोधी संघाचा सामना करेल. यानंतर ४ प्लेऑफ सामने होतील. ६ पैकी ३ संघांचे मालक आयपीएल संघ मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित आहेत. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, बिग बॅश लीगचे सामने जानेवारीमध्येच आयोजित केले जातात. अशा परिस्थितीत जास्त पैसे मिळाल्याने वॉर्नर यूएईमध्ये खेळताना दिसू शकतो.
प्रत्येक संघाकडे २० कोटी आहे
युएई टी२० लीगमधील प्रत्येक संघाची पर्स २०० कोटी आहे. आयपीएल बद्दल बोलायचे झाले तर इथे सर्वात महागड्या खेळाडूला १६ कोटी रुपये मानधन मिळते. त्याचवेळी, पाकिस्तान सुपर लीगमध्ये १.६० कोटी, इंग्लंडमध्ये होणाऱ्या द हंड्रेडमध्ये १.३१ कोटी, तर ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये, परदेशी खेळाडूंना जास्तीत जास्त १.९० कोटी रुपये दिले जातात. नियमानुसार, प्रत्येक १८ सदस्यीय संघात १२ विदेशी खेळाडू ठेवता येतात.
९ परदेशी खेळाडू खेळू शकणार आहेत
युएई टी२० लीगच्या प्लेइंग-११ मध्ये ९ परदेशी खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय यूएईचा एक आणि असोसिएट देशाच्या एका खेळाडूला स्थान देण्यात येणार आहे. त्याच वेळी, संघात समाविष्ट असलेल्या १८ खेळाडूंपैकी १२ परदेशी खेळाडूंव्यतिरिक्त, ३ यूएईचा, २ इतर देशाचा आणि २३ वर्षांखालील यूएईचा एक खेळाडू असावा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
WIvIND: टी२० मालिकेसाठी कॅरेबियन संघाची घोषणा; आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंचे कमबॅक
टी२० विश्वचषकात दुबळा पडू शकतो इंग्लंडचा संघ, ‘हा’ दिग्गज वेगवान गोलंदाज स्पर्धेला मुकण्याची शक्यता