भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक विक्रम नावावर केले आहेत. रोहित शर्मा आपल्या अप्रतिम षटकारांसाठी खासकरून ओळखला जातो. मागच्या वर्षी त्याने तब्बल 80 षटकार मारले असून वर्षात सर्वाधिक षटकार मारणाच्या बाबत मागच्या काही वर्षांमध्ये त्याने अव्वल क्रमांक सोडला नाहीये. असे असले तरी 2023 मध्ये रोहितपेक्षा मोठा ‘सिक्सर किंग’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उदयाला आला आहे, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. पण आकडे पाहिल्यानंतर हे सत्य मान्य करावे लेगते.
युनायटेड अरब अमिरात म्हणजेच यूएईचा फलंदाज मुहम्मद वसीम याने रोहित शर्माला सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित मागच्या काही वर्षात इतर कोणत्याही फलंदाजाला आपल्या आस-पास देखील फिरकू देत नव्हता. 2023 मध्येही त्याची बॅट चांगलीच चालली. पण वर्षात सर्वाधिक षटकार करणाऱ्यांच्या यादीत त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर होता. आता हा विक्रम मुहम्मद वसीमच्या नावावर झाला आहे. वसीमने मागच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये सर्वाधिक 101 षटकार मारले. तसेच एका वर्षात 80 पेक्षा जास्त षटकार मारणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. (UAE’s Muhammad Waseem broke Rohit Sharma’s record for most sixes in a year)
Muhammad Waseem becomes the FIRST player to hit 100 international sixes in a year.
Most sixes in a year
101 – Muhammad Waseem🇦🇪 in 2023
80 – Rohit Sharma🇮🇳 in 2023
78 – Rohit Sharma🇮🇳 in 2019
74 – Rohit Sharma🇮🇳 in 2018
74 – Suryakumar Yadav🇮🇳 in 2022
65 – Rohit Sharma🇮🇳 in 2017… pic.twitter.com/jrIZcFuljN— Kausthub Gudipati (@kaustats) December 31, 2023
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
101 (2023) – मुहम्मद वसीम (यूएई)
80 (2023) – रोहित शर्मा (भारत)
78 (2019) – रोहित शर्मा (भारत)
74 (2018) – रोहित शर्मा (भारत)
74 (2022) – सूर्यकुमार यादव (भारत)
दरम्यान, मुहम्मद वसीम प्रतिनिधित्व करत असणाऱ्या यूएई संघाने नुकतीच अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळली. दोन सामन्यांच्या या मालिकेतील शेवटचा सामना यूएईने 11 धावांनी जिंकला. यूएईसारख्या नव्या संघासाठी हा विजय नक्कीच महत्वाचा ठरला. दुसरीकडे अफगाणिस्तान संघ मागच्या काही वर्षांमध्ये चांगले प्रदर्शन करत असला, तरी त्यांना ही मालिका जिंकता आली नाही. मुहम्मद वसीमने या सामन्यात 32 चेंडूत 53 धावा केल्या. यात त्याने 3 षटकार मारल्यामुळे वर्षातील आपल्या 100 षटकारांचा टप्पा पार केला. तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने 72 धावांनी विजय मिळवला होता. परिणामी ही मालिका 1-1 अशा बरोबरीत सुटली.
महत्वाच्या बातम्या –
दिग्गजाने 2023 चा ‘ब्रेकआउट परफॉर्मर’ म्हणून केली गिलची निवड, कौतुक करत सांगितली मोठी गोष्ट
पाकिस्तानने केली नवीन गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा, माजी दिग्गज सांभाळणार जबाबदारी