तुर्कीश क्लब बेसिकसवर युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनने(युइएफए) 30,000 पौंडचा दंड आकारला आहे. त्यांच्या घरच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात एक मांजर त्यावेळी पिचवरून गेल्याने त्यांना हा दंड केला आहे.
तेव्हा त्यांचा चॅम्पियन लीगमधील हा सामना बायर्न म्युनिच विरूध्द सुरू होता.
युइएफएने बेसिकसवर ढिसाळ नियोजन केल्याने हा दंड ठोठावला आहे. सामना सुरू असताना रेफ्रि मायकल ऑलिव्हर यांना पिचवरून मांजर गेल्याचे दिसले. यामुळेच त्यांनी दुसऱ्या सत्रात सुरू असणारा हा सामना मधेच थांबवला.
https://twitter.com/PTcampbell/status/973991121138237440
तसेच युइएफएने बेसिकसकडून आणखी एक दंड आकारला आहे. इस्तंबूलमधील वोडाफोन पार्क स्टेडियमवर चाहत्यांनी वस्तू फेकल्याने आणि पायऱ्यावरील रस्ता अडवल्याने युइएफएने हा दंड केला आहे.
जर्मन चॅम्पियन बायर्नने हा सामना 3-1 ने जिंकून क्वार्टरफायनलमध्ये त्यांनी स्पॅनिश क्लब सेविलावर 8-1 ने मोठा विजय मिळवला.
मात्र शेवटच्या चार स्थानांमध्ये त्यांना विजेत्या रियल माद्रिद संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला.
बायर्नला पण रियल माद्रिद विरूध्दच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या गैर वर्तनामुळे युइएफएने 22,000 पौंडचा दंड केला आहे.
त्या सामन्यात असे झाले की, एक चाहता मैदानावर आल्याने तसेच काहींनी प्रेक्षकात चुकीचा संदेश लिहलेले बॅनर दाखवले होते.
रोम संघाकडून सुद्धा दंड आकारण्यात आला आहे. चॅम्पियन लीगमधील युक्रेन क्लब शाखार डोनेट्स्क विरूध्दच्या सामन्यात त्यांच्या बॉल बॉईजने अतिरिक्त वेळ वाया घालावल्यामूळे त्यांना हा दंड झाला.