---Advertisement---

Video- ओवरमध्ये जिंकायला हव्या होत्या ५ धावा, घडले असे काही की!

---Advertisement---

एखाद्या संघाच्या हातातोंडाशी आलेला घास आचानक दुसऱ्या संघाने हिरावून घ्यावा, असेच काहीसे आज आयसीसीच्या वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हीजन 4 स्पर्धेत युगांडा विरुद्ध डेन्मार्क यांच्यातील सामन्यात पहायला मिळाले.

या सामन्यात डेन्मार्कला विजयासाठी 6 चेंडूत 5 धावांची गरज होती. पण त्यांनी या शेवटच्या षटकात तब्बल 4 विकेट्स गमावत सामनाही गमावला.

त्यामुळे युगांडाने हा सामना 1 धावेने जिंकला. या  4 विकेट्सपैकी 3 विकेट्स तर फलंदाज धावबाद झाल्यामुळेच गेल्या. तर 1 विकेट फलंदाज पायचीत झाल्याने गेली.

https://twitter.com/ICC/status/992018436791271426

या शेवटच्या षटकात फक्त 3 धावा डेन्मार्कला करता आल्या. या षटकात डेन्मार्कच्या अनीक उदीन,बसित राजा, निकोलज लागेस्गार्ड आणि बाशीर शाह या फलंदाजांनी विकेट्स गमावल्या.

पावसाच्या व्यत्ययामुळे डेन्मार्कसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 29 षटकात 131 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. पण त्यांना 29 षटकात सर्वबाद 129 धावाच करता आल्या.

तत्पूर्वी, युगांडाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 215 धावा केल्या होत्या.

याआधी 2016च्या टी20 विश्वचषकातील भारत विरुद्ध बांग्लादेेश संघात झालेल्या सामन्यातही असाच निकाल पहायला मिळाला होता.

बांग्लादेशला शेवटच्या 3 चेंडूंवर 2 धावांची गरज असताना त्यांच्या 3 फलंदाजांनी विकेट्स गमावल्यामुळे भारताने हा सामना 1 धावेने जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

पहा व्हिडीवो- बर्थडेचं यापेक्षा चांगले सरप्राईज असुच शकत नाही!

कोहलीपेक्षा मी लांब षटकार मारतो, मग कशाला कमी खायचं!

अफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार आहे, विराट कोहली विरुद्ध नाही

बेंगलोर चाहत्यांसाठी गुड न्युज, सीएसकेची धुलाई करण्यासाठी हा खेळाडू सज्ज

सगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment