---Advertisement---

अल्टिमेट खो खो स्पर्धेत प्रज्वल, सचिन कामगिरीमुळे मुंबई खिलाडीजला नमवून तेलगु योद्धाज अव्वल स्थानी

On: मंगळवार, ऑगस्ट 23, 2022 10:54 PM
---Advertisement---

पुणे, 23 ऑगस्ट, 2022: पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत कर्णधार के एच प्रज्वल आणि सचिन भार्गो यांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर तेलगु योद्धाज संघाने मुंबई खिलाडीजसंघाला 12गुणांच्या फरकाने पराभुत करून गुणतालिकेत आघाडीच्या स्थानावर झेप घेतली आहे.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रज्वलने कर्णधार
राला साजेशी खेळी करताना 3मिनिटे 1सेकंद संरक्षण केले, तर भार्गोने अष्टपैलू कामगिरी बजावताना आक्रमणात 10 गुण व संरक्षणात 3मिनिटे 47 सेकंद अशी कामगिरी केल्यामुळे तेलगु योद्धाज संघाला मुंबई खिलाडीज संघावर 55-43 असा विजय मिळवता आला.

रोहन शिंगाडे आणि आदर्श मोहिते यांनी अनुक्रमे 11 आणि 9 गुणांची कमाई करताना तेलगु योद्धाजच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

मुंबई खिलाडीज संघाकडून या मौसमातील सर्वोत्तम संरक्षक दुर्वेश साळुंखे याने पहिल्या डावातील 2मिनिटांसाह एकूण 5मिनिटे 11 सेकंद संरक्षण करतानाच आक्रमणात 6 गुण नोंदवून कडवी झुंज दिली.

अविक सिंग याने 8 गुणांची कमाई करताना त्याला उत्तम साथ दिली. मात्र, ही जोडी मुंबईचा पराभवटाळू शकली नाही.

या विजयाबरोबच तेलगु योद्धाज संघाने गुजरात जयंट्स संघाला(10गुण) मागे टाकून 12 गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली. तरीही, गुजरात जयंट्स संघाला आज रात्री चेन्नई क्विक गन्सवर मात करून पुन्हा आघाडीचे स्थान मिळवण्याची संधी आहे.

त्याआधी राजस्थान वॉरियर्सवर दणदणीत विजयामुळे आत्मविश्वास उंचाबलेल्या तेलगु योद्धाज संघाने वेगवान आक्रमण करताना मुंबई संघाचे 10 खेळाडू झटपट बाद करून पहिल्या पाच मिनिटांअखेर 26-00,अशी आघाडी घेतली. भार्गोने 10 गडी बाद करताना त्यात महत्वाचा वाटा उचलला. पुढच्या डावात अवधूत पटेलने 2मिनिटे 46 सेकंद तर अरुण गुंकी याने नाबाद 2मिनिटे संरक्षण करताना तेलगु योद्धाजची आघाडी 28-20 अशी कायम राखली. पुढच्या सात मिनिटात दुर्वेश साळुंखेने आटोकाट प्रयत्न करूनही तेलगु योद्धाजची आघाडी कायम राहिली साळुंखेने 3मिनिटे 11 सेकंद संरक्षण करून मुंबईला 4 बोनस गुण मिळवून दिले. त्यामुळे तेलगु योद्धाजची आघाडी 23 गुणांवर रोखली गेली.

अखेरच्या डावात प्रज्वलने 3मिनिटापेक्षा अधिक काळ संरक्षण करताना तेलगु योद्धाजच्या 55-43 अशा विजयाची निश्चिती केली.

बुधवारी, 24 ऑगस्ट 2022 रोजी चेन्नई क्विक गन्स विरुद्ध ओडिशा जुगरनट्स यांच्यात पहिला सामना तर दुसरा सामना मुंबई खिलाडीज विरुद्ध राजस्थान वॉरियर्स यांच्यात होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---