अल्टीमेट खो खो लीगच्या पहिल्या मोसमासाठी आयोजकांनी एकूण 2 कोटी रुपयांची पारितोषिक रक्कम जाहीर केली आहे. भारतातील पहिल्या खो खो लीग स्पर्धेत खेळाडूंच्या कौशल्यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले असून आता उद्या शुक्रवार, 2 सप्टेंबर रोजी अव्वल चार संघांमध्ये प्ले ऑफ फेरी सुरू होत आहेत. गुजरात जायंट्स, ओडिशा जगरनट्स, तेलगु योद्धाज, चेन्नई क्विक गन्स हे संघ विजेतेपदासाठी झुंज देणार आहेत.
विजेत्या संघाला 1कोटी रुपये पारितोषिक देण्यात येणार असून उपविजेत्या संघाला 50लाख रुपये देण्यात येणार आहेत. तिसऱ्या स्थानावरील 30लाख व चौथ्या क्रमांकावरील संघाला 20लाख रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्टील्मेट खो खो लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेंझिंग नियोगी यांनी दिली.
नियोगी पुढे म्हणाले की, या खेळात प्रचंड गुणवत्ता असून हा खेळ वरच्या स्तरावर नेण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत.आम्ही जाहीर केलेलल्या पारितोषिक रकमेमुळे केवळ खेळत असलेल्या संघानाच नव्हे तर टीव्हीवर ही स्पर्धा पाहणाऱ्या आणि भविष्यात खो खो कडे वळणाऱ्या हजारो भावी खेळाडूंना ही प्रेरणा मिळेल अशी आमची खात्री आहे.
ऑलिम्पिक खेळात समावेश नसलेल्या आणि क्रिकेट व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय खेळासाठी ही सर्वोच्च पारितोषिक रक्कम आहे. प्ले ऑफ फेरीतील क्वालिफायर 1 लढतीत गुजरात जायंट्स(23गुण), ओडिशा जगरनट्स(21गुण)यांच्यात उद्या शुक्रवारी, 2 सप्टेंबर 2022रोजी पहिला सामना होणार आहे. तर, दुसऱ्या प्ले ऑफ लढतीत तेलगु योद्धाज(19गुण) आणि चेन्नई क्विक जन्स(15गुण)यांच्यात एलिमीनेटर सामना रंगणार आहे.
गुजरातकडून वझीर अभिनंदन पाटील आणि ओडिशाकडून सुभाषिश संत्रा यांनी आक्रमणात 73 आणि 49 गुण मिळवून सर्वोत्तम कामगिरी केली आहे.तेलगु योद्धाजने 6 तर चेन्नईने 5 सामने जिंकलेले आहेत.
चेन्नईचा रामजी कश्यप हा(19.49मिनिटे)सर्वोत्तम संरक्षक ठरला असून 130 गुणांसह दुसऱ्या क्रमांकाचा आक्रमक ठरला आहे.राजस्थानचा मझहर जमादार 105 गुणांसह अव्वल आक्रमक ठरला आहे. तेलगु योद्धाज कडून अरुण गुंकीने 7.78 सरासरी 70 गुण मिळवले आहेत.
क्वालिफायर 1लढतीतील प्रमुख संघ एलिमीनेटर विजयी संघाशी शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर मध्ये लढणार आहे. आणि क्वालिफायर 1 आणि 2 मधील विजयी संघ रविवारी 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम लढतीत विजेतेपदासाठी झुंज देतील.
अमित बर्मन यांनी पुरस्कृत केलेल्या अखिल भारतीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धवनसाठी मुलगी शोधा! नवीन व्हिडिओ व्हायरल, भारताचा सलामीवीर करणार का दुसरे लग्न?
पुन्हा एकदा सचिन करणार टीम इंडियाचे नेतृत्व! ‘या’ स्पर्धेतून करतोय कमबॅक
अल्टिमेट खो खो स्पर्धेत राजस्थान वॉरियर्सला नमवून गुजरात जायंट्सचा विजयी समारोप