---Advertisement---

अल्टिमेट खो-खो: मुंबई खिलाडीज संघाचा विजयाने समारोप

On: मंगळवार, ऑगस्ट 30, 2022 10:49 PM
---Advertisement---

पुणे, 30 ऑगस्ट 2022: पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत मुंबई खिलाडीज संघाने ओडिशा जगरनट्स संघाचा 79-31 असा एकतर्फी पराभव करून आपल्या मोहिमेचा विजयाने समारोप केला.

शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत गजानन शेनगल याने 17 गुण, तर शुभम कच्ची याने 11गुणांची कमाई करत मुंबई खिलाडीजच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला.मुंबईने आपली विजयी सांगता करत ओडिशा जगरनाट्स संघाची सलग सहा सामन्यात विजयी मिळवण्याची घौडदौड रोखली.

मुंबई खिलाडीज संघाला 10 सामन्यात 4 विजयासह 12 गुणांसह गुण तालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

ओडिशा जगरनाट्स संघ 21गुणांसह गुण तालिकेत अव्वल स्थानी असून त्यांनी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

ओडिशा संघाकडून दिनेश नाईक याने सुरेख आक्रमण करत 12 गुणांची कमाई केली. त्याने उत्कृष्ट डाईव्ह मारत 4गडी बाद केले. त्यानंतर मनोज घोटेकरने 8 गुणांची कमाई करून त्याला उत्तम साथदिली.

याशिवाय ओडिशा जगरनाट्स, गुजरात जयंट्स(20गुण), तेलगु योद्धाज(16गुण) आणि चेन्नई क्विक गन्स(15गुण) या संघांनी याआधीच प्ले ऑफ मध्ये प्रवेश निश्चित केला आहे.

त्याआधी मुंबई खिलाडीज संघाने सलग सहा विजय मिळवणाऱ्या ओडिशा जगरनट्सला पहिल्या सत्रात जबरदस्त झुंज दिली.तरीही ओडिशा संघाने 12-10 अशी दोन गुणांची आघाडी मिळवली. प्ले ऑफ मधील स्थान अगोदरच निश्चित केल्यामुळे ओडिशा संघाने या सामन्यात विशाल दिलीप खांडवी आणि दिपेश मोरे या अव्वल खेळाडूंना विश्रांती दिली होती. त्याचा फायदा घेत मुंबई खिलाडीज संघाने दुसऱ्या सत्रात वेगवान सुरुवात केली.

गजानन शेनगलने चार बचावपटूंना बाद केल्यामुळे मुंबईने 31 गुणांची भर घालताना मध्य तरला 43-12अशी आघाडी घेतली.

मुंबईने आपली कामगिरी दुसऱ्या डावातही कायम राखताना उत्कृष्ट बचावाचे दर्शन घडवत ओडिशाला केवळ 19 गुणांची नोंद करून दिली. अखेरच्या चौथ्या सत्रात 47-31 अशी आघाडी घेऊन खेळताना मुंबई खिलाडीजने ओडिशाच्या 13 खेळाडूंना बाद करतं 79-31 अशा विजयाची पूर्तता केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---