---Advertisement---

अल्टिमेट खो खो स्पर्धेत ओडिशा जगरनॉट्स रोखली चेन्नई क्विक गन्सची विजयी घौडदौड

On: गुरूवार, ऑगस्ट 25, 2022 8:27 AM
---Advertisement---

पुणे: पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या ओडिशा जगरनॉट्स संघाने 10 गुणांनी आव्हासक विजय मिळवताना चेन्नई क्विक गन्स संघाची विजयी घौडदौड रोखून सनसनाटी निकालाची नोंद केली.

ओडिशा संघाचा हा तिसरा विजय ठरला. या विजयामुळे ओडिशा संघाने एकूण 12 गुणांची कमाई करताना गुण तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असून चेन्नई संघावर सलग दुसऱ्या विजयचीही नोंद केली. याआधीच्या लढतीत त्यांनी चेन्नई 8 गुणांच्या फरकाने पराभुत केले होते.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत निलेश जाधवने ओडिशा संघाकडून सर्वोत्तम कामगीरी करताना 15 गुणांची कमाई केली व यात पाच अप्रतिम डाईव्हचा समावेश होता. कर्णधार मिलिंद चावरेकर आणि सूरज लांडे यांनी अनुक्रमे 9 आणि 8 गुण टिपून त्याला चांगली साथ दिली.

चेन्नई क्विक गन्स संघाकडून पी नरसय्या आणि मनोज पाटील यांनी प्रत्येकी 8 गुण नोंदवले, तर ओडिशा संघाकडून एम के गौतम आणि जगन्नाथ मुरुमु यांनी अनुक्रमे 2मिनिटे 33 सेकंद आणि 2मिनिटे 59 सेकंद संरक्षण करताना कडवी झुंज दिली. मात्र ओडिशा संघाने पहिल्या सात मिनिटांत चेन्नई संघाला वेगाने गुण मिळवण्यापासून रोखत त्यांची आघाडी 19-04 अशी रोखली.दुसऱ्या सत्रात चेन्नईच्या रामजी कश्यपने 2मिनिटे 23 सेकंद संरक्षण करूनही ओडिशाने वेगवान आक्रमणाच्या साहाय्याने पहिल्या डावा अखेर 28-19 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली.

सुभाषिश संत्राने ओडिशा कडून चार बोनस गुणांसह 3मिनिटे 4 सेकंद संरक्षण केल्यामुळे तिसऱ्या सत्रात चेन्नई क्विक गन्स संघाला केवळ 37-32 अशी पाचच गुणांची आघाडी घेता आली.मात्र अखेरच्या सात मिनिटात जबरदस्त आक्रमण करताना ओडिशा संघाने तब्बल 19 गुणांची कमाई केली . त्यामुळे त्यांना 51-41 अशा फरकने विजय मिळवता आली.

गुरुवारी, पहिला सामना ओडिशा जुगरनट्स विरुद्ध राजस्थान वॉरियर्स तर दुसरा सामना गुजरात जयंट्स विरुद्ध तेलगु योद्धाज यांच्यात होणार आहे.

अमित बर्मन यांनी पुरस्कृत केलेल्या अखिल भारतीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

लवकरच चाहत्यांना मैदानात होणार बुमराहचे दर्शन! पोस्ट शेअर करत दिली इन्जूरी अपडेट
‘लोक सगळं विसरून जातील’, विराटच्या खराब फॉर्मवर शास्त्री गुरुजींची विशेष टिपण्णी
झिम्बाब्वेला क्लिन स्वीप करत भारताचा पाकिस्तानला ‘दे धक्का’, वनडे क्रमवारीत पोहोचला ‘या’ स्थानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---