पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) फलंदाज उमर अकमलवर ३ वर्षांची बंदी घातली आहे. २९ वर्षीय अकमलला आता पुढील ३ वर्षांसाठी तिन्ही क्रिकेट प्रकारात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करता येणार नाही.
दोन महिन्यांपूर्वी फेब्रुवारीमध्ये अकमलविरुद्ध पीसीबीची शिस्त समिती मॅच फिक्सिंगमधील आरोपांची तपासणी करत होती. अकमलने ऑक्टोबर २०१९मध्ये श्रीलंकेविरुद्ध लोहार येथे खेळण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते.
तरी पीसीबीने अकमलविरुद्ध तपासणी सुरु करण्याच्या खास कारणांचा खुलासा केला नव्हता. यावर्षी फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी संहिता कलम २.४.४चे दोन उल्लंघन केल्यामुळे त्याच्याविरुद्ध तपासणी सुरु केली होती.
पीसीबीने ट्वीट करत अकमलवर लागलेल्या बंदीबद्दल माहिती दिली. या ट्वीटमध्ये बोर्डाने लिहिले की, “अकमलवर शिस्त समितीचे अध्यक्ष जस्टीस (निवृत्त) फजल-ए-मीरन चौहानकडून ३ वर्षांसाठी बंदी घातली आहे.”
Umar Akmal banned from all cricket for three yearshttps://t.co/GLlmpDJwtA https://t.co/M2cp0A9vQV pic.twitter.com/rgIXZ32O6a
— PCB Media (@TheRealPCBMedia) April 27, 2020
अकमलने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शतक ठोकले होते. तेव्हा त्याला भविष्यातील स्टार क्रिकेटपटू म्हटले होते. तरी तो पुढे आपल्या कामगिरीत सातत्य ठेवू शकला नाही. पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद पीसीबीमध्ये होत असलेल्या वादांमुळे चिंतेत पडले होते. त्यामुळे त्यांनी टोकाची भूमिका घेत म्हटले होते की, जो कोणी भ्रष्टाचार करेल त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे.
मियाँदाद म्हणाले होते की, “मॅच फिक्सिंगमध्ये समावेश असणाऱ्या क्रिकेटपटूंना सर्वात कठोर शिक्षा दिली पाहिजे. बोर्डाने अशी शिक्षा देऊन सर्वांसमोर असे उदाहरण तयार केले पाहिजे. तसेच चूकीची कामे करणाऱ्या लोकांना फाशी दिली पाहिजे.”
अकमलने पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२० सुरु होण्याच्या काही वेळापूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या क्वेटा ग्लेडिएटर्स (Quetta Gladiators) संघाचा सामना इस्लामाबादविरुद्ध होणार होता. तो पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलचा (Kamran Akmal) छोटा भाऊ आणि सध्याचा कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam) नातेवाईक आहे.
अकमलने पाकिस्तान संघाकडून आतापर्यंत १६ कसोटी सामने, १२१ वनडे सामने आणि ८४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १००३, वनडेत ३१९४ आणि टी२०त १६९० धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेट जगताने वाहिली इरफान खानला श्रद्धांजली
-अख्तरने केला होता जगाला चक्रावुन टाकणारा विक्रम, पण आयसीसी झाली होती व्हिलन
-प्रश्न होता विराटचा, पण युवीने बोलती बंद केली बुमराहची