---Advertisement---

आयपीएलचा एकही सामना न खेळता ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये ५ हजार धावा करणारे ५ खेळाडू

On: गुरूवार, एप्रिल 23, 2020 8:00 PM
---Advertisement---

टी२० लीग क्रिकेटमध्ये सर्वाधिक लोकरप्रिय स्पर्धा म्हणून इ्ंडियन प्रिमियर लीगकडे पाहिले जाते. या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना प्रसिद्धी आणि पैसा या दोन्ही गोष्टी मिळतात. 

तसेच अनेक व्रिकमही इ्ंडियन प्रिमियर लीगमध्ये होतात. त्याची चांगलीच दखल घेतली जाते. ही लीग जवळजवळ दोन महीने चालत असल्यामुळे खेळाडूंना धावांचे डोंगर उभे करता येतात. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील क्रिकेटपटू उत्सुक असतात. 

असे असले तरी असे काही खेळाडू आहेत ज्यांनी ह्या लीगमध्ये एकही सामना न खेळता बाकी लीग खेळत ५ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 

१. अहमद शाहजाद

अहमद शाहजाद या पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश आहे. अहमद शाहजादने २१९ सामन्यात २९.१६च्या सरासरीने ५९७९धावा केल्या आहेत. या खेळाडूलाही कोणताही आयपीएल सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

२. तमिम इक्बाल

तमिम इक्बाल हा बांगलादेशचा अनुभवी क्रिकेटपटूने २०६ सामन्यात ३१च्या सरासरीने ५७६६धावा केल्या आहेत. परंतु त्यालाही एकही आयपीएल सामना खेळण्याची कधीही संधी मिळाली नाही.

३. जेम्स विन्स

जेम्स विन्स हा इंग्लंडचा अतिशय़ स्फोटक फलंदाज टी२०तही अतिशय धमाकेदार खेळी करतो. त्याने २१९ सामन्यात ३०.२१च्या सरासरीने ५७४० धावा केल्या आहेत. परंतु त्याचाही नशिबात एकही आयपीएल सामना नाही.

४. कॅमेरुन डेलपोर्ट 

कॅमेरुन डेलपोर्ट हा दक्षिण आफ्रिकेतील देशांतर्गत क्रिकेट खेळणारा एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. ३० वर्षीय कॅमेरुनने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. परंतु त्याने २३६ टी२० सामन्यांत २५.८४च्या सरासरीने ५५७५ धावा केल्या आहेत

५. उमर अकमल

उमर अकमलने २६० सामन्यात २८.९५च्या सरासरीने ५५३० धावा केल्या आहेत. त्याचा मोठा भाऊ कामरान अकमलला आयपीएलमध्ये काही सामने खेळण्याची संधी मिळाली परंतु अशी संधी उमरला कधीही मिळाली नाही.

६. पाॅल स्टर्लिंग

आय़र्लंडचा महान फलंदाज पाॅल स्टर्लिंगने २१७ सामन्यांत टी२० २६.४३च्या सरासरीने ५४७३ धावा केल्या आहेत. परंतु तो देखील एकही आयपीएल सामना आजपर्यंत खेळू शकला नाही.

७. डाविद मालन

आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत १५२चा स्ट्राईक रेट व ५१.११ची सरासरी असलेला डाविद मालन हा आजपर्यंत एकही आयपीएल सामना खेळू शकला नाही. त्याने २०० टी२० सामन्यात ३३.३१च्या सरासरीने ५४३० धावा केल्या आहेत.

८. रिकी वेसल्स

रिकी वेसल्स हा ऑस्ट्रेलियामधील प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा खेळाडू असून तो ऑस्ट्रेलियाकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्याने २२० टी२० सामन्यात २९.४७च्या सरासरीने ५३.०५ धावा केल्या आहेत. त्यालाही एकही आयपीएल सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

ट्रेंडिंग घडामोडी – 

ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषकाऐवजी होणार आयपीएल?

या कारणामुळे मास्टर ब्लास्टर साजरा करणार नाही वाढदिवस

केवळ २ वेळा कसोटीत फिरकीपटूंनी टाकल्या होत्या पहिल्या २ ओव्हर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment