2024 टी20 विश्वचषकात विराट कोहली आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे. पहिल्या तीन सामन्यात त्याला एकदाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. मात्र असं असलं तर, एकूण टी20 विश्वचषकाच्या इतिहासात त्याची आकडेवारी खूपच चांगली आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं विराट कोहलीच्या या रेकॉर्डवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हा क्रिकेटपटू माजी यष्टीरक्षक कामरान अकमल असून, त्यानं त्याचा भाऊ उमर अकमल याचा टी20 विश्वचषकातील रेकॉर्ड विराटपेक्षा चांगला असल्याचं म्हटलं आहे. कामरान अकमलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘एआरवाय न्यूज’वर बोलताना कामरान म्हणाला, “मला काल काही आकडे मिळाले. मी उमरबद्दल बोलत आहे. टी20 विश्वचषकात उमर अकमलची आकडेवारी विराट कोहलीपेक्षा चांगली आहे. उमरचा स्ट्राइक रेट चांगला आहे. त्यानं टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.”
Kamran Akmal says Umar Akmal has better stats than Virat Kohli in T20 World Cup. #T20WorldCup #USAvsIRE pic.twitter.com/TnuLhedKa7
— Nawaz 🇵🇰 (@Rnawaz31888) June 15, 2024
तसं पाहिलं तर, कामरान अकमलचं म्हणणं काही प्रमाणात बरोबर आहे. टी20 विश्वचषकात उमरचा स्ट्राइक रेट 132.42 आणि कोहलीचा 130.52 आहे. टी20 विश्वचषकात उमरची सर्वोत्तम धावसंख्याही कोहलीपेक्षा जास्त आहे. उमरनं 2014 च्या टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 94 धावांची खेळी केली होती. तर विराट कोहलीनं 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद 89 धावांची खेळी केली होती.
कामरान अकमलनं विराट कोहलीचा टोमणा मारताना म्हटलं की, उमरकडे त्याची आकडेवारी आणि कामगिरीचा प्रचार करण्यासाठी विराट कोहलीसारख्या पीआर कंपन्या नाहीत. तो म्हणाला, “आमच्याकडे पीआर कंपन्या नसल्यामुळे आम्ही आमची आकडेवारी आणि कामगिरी सोशल मीडियावर शेअर करत नाही.”
कामरान अकमलचं हे विधान पाकिस्तान 2024 टी20 विश्वचषकाच्या साखळी फेरीतून बाहेर पडल्यानंतर आलं आहे. संघाचा शेवटचा औपचारीक सामना रविवारी फ्लोरिडामध्ये आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
या 3 कारणांमुळे पाकिस्तानचा संघ टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला
‘कुदरत का निजाम’ पुन्हा एकदा अपयशी! पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मोक्याच्या क्षणी नेहमीच होतो फ्लॉप
टी20 विश्वचषकातून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला दुहेरी झटका, 2026 च्या स्पर्धेत थेट एंट्री मिळणार नाही!