---Advertisement---

बाजीगर उमेश! तब्बल 43 महिन्यांनंतर उतरला टी20 सामन्यात

On: मंगळवार, सप्टेंबर 20, 2022 8:01 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला मंगळवारी (20 सप्टेंबर) सुरुवात झाली. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी भारतीय संघात या सामन्यासाठी काही बदल करण्यात आले. भारतीय संघाने प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती देत अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव याला संधी दिली. उमेशने तब्बल 43  महिन्यांनंतर टी20 संघात पुनरागमन केले आहे.

उमेश यादव याची या मालिकेसाठी मुख्य संघात निवड झाली नव्हती. मात्र, मोहम्मद शमी हा कोरोना बाधित झाल्याने त्याला संघात सामील केले गेले. तसेच त्याला मालिकेतील पहिल्या सामन्यातही अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली. उमेश तब्बल 43 महिन्यानंतर भारतासाठी टी20 क्रिकेट खेळेल.

उमेशने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. 24 फेब्रुवारी 2019 रोजी विशाखापट्टणम येथील सामन्यात त्याने अखेरच्या वेळी निळी जर्सी परिधान केलेली. उमेशने आपले आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण 2012 मध्ये केले होते. तेव्हापासून तो केवळ 7 टी20 सामने खेळू शकला आहे.

उमेश यादवसाठी 2022 हे वर्ष फारच कमालीचे जात आहे. यावर्षी आयपीएलच्या लिलावात पहिल्या राउंडमध्ये त्याला कोणीही बोली लावली नव्हती. मात्र, त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला संघात स्थान दिले. तो आयपीएलमध्ये 20 बळी घेण्यात यशस्वी ठरलेला. त्यानंतर काउंटी क्रिकेटमध्ये त्याने मिडलसेक्स काउंटी संघांसाठी प्रथमश्रेणी तसेच वनडे स्पर्धेत सातत्याने बळी मिळवत आपल्या फॉर्मचे संकेत दिले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

कार्तिकला घ्या ‘त्याला’ काढा! माजी दिग्गजाची टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठी प्रतिक्रिया
पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीगमध्ये परमार ऑल स्टार्स, आरएस कॅनन्स, बॉल ब्रेकर्स, द व्हर्लविंड्स संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---