भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत आल्याचे दिसत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी अवघ्या 76 धावांची आवश्यकता आहे. कसोटी क्रिकेटच्या मानाने हे आव्हान अतिशय तोकडे असले तरी, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज उमेश यादव याने विजयाचा आशावाद व्यक्त केला आहे.
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नॅथन लायन याच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताला फार मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. भारताचा दुसरा डाव केवळ 163 धावांवर संपुष्टात आला. लायनने भारताचे आठ गडी बाद केले. सामना संपण्यासाठी आणखी तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवशी लागू शकतो. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी कमी धावांचे आव्हान असले तरी, भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज उमेश यादव याला विजयाची आशा आहे.
दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर बोलताना तो म्हणाला,
“क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करू. या खेळपट्टीवर धावा बनवणे सोपे नाही. दोन्ही संघाच्या फलंदाजांना येथे फलंदाजी करताना सहजता वाटली नव्हती. या खेळपट्टीवर चेंडू चांगलाच खाली राहतोय. इथे पुढे सरसावत येऊन फटके मारणे अवघड जाईल. आम्ही अधिकाधिक असून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार आहोत.”
मालिकेतील पहिले दोन सामने देखील तीन दिवसातच संपुष्टात आले होते. सकाळच्या सत्रात नवीन चेंडू चांगली फिरकी घेत असल्याने, ऑस्ट्रेलियाला हे आव्हान पार करण्यासाठी मेहनत करावी लागण्याची शक्यता आहे.
(Umesh Yadav Hoping India Defend 76 Runs In Indore Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने उरकला साखरपुडा, पार्टनरला किस करत जगाला सांगितली आनंदाची बातमी
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारे 4 खेळाडू; तीन भारतीय सोडले, तर लायन एकमेव ऑस्ट्रेलियन