दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत दुसऱ्या टी२० सामन्यात पंच म्हणून काम पाहिलेले पंच अल्लाउद्दीन पालेकर हे मुळचे रत्नागिरीमधील खेड तालुक्यातील शीव गावचे आहेत. यामुळे खेडचे नाव दक्षिण आफ्रिकेत आणि जागतिक क्रिकेटमध्ये अभिमानाने घेतले जाणार आहे.
दुसऱ्या टी२० सामन्यात सामन्यात दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पालेकर पहिल्यांदा आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचगिरी करत असताना त्यांनी पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला बाद देत योग्य निर्णय देण्याची चुणूक दाखवून दिली.
आयसीसीची आतंरराष्ट्रीय दर्जाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांची नियुक्ती आयसीसीच्या मुख्य पंच पॅनेलमध्ये निवड करण्यात आली.
#CSAnews CSA congratulates Allahudien Paleker on his promotion to ICC International Panel https://t.co/6NJN5b2mpz pic.twitter.com/ThGR9hLTyk
— Proteas Men (@ProteasMenCSA) November 17, 2017
त्यांनी यापुर्वी १६ प्रथम श्रेणी आणि २१ लीस्ट अ दर्जाचे सामने खेळले आहेत. त्यांनी नाॅर्थन आणि वेस्टर्न प्रोविन्सकडून प्रथम श्रेणी आणि लीस्ट अ दर्जाचे सामने खेळले आहेत.
पंच म्हणून त्यांनी आजपर्यंत ६८ प्रथम श्रेणी, ५० लीस्ट अ दर्जाचे आणि ४७ टी२० सामन्यांत कामगिरी पार पाडली आहे.
espncricinfo.com वेबसाईट प्रमाणे अल्लाउद्दीन पालेकर यांचे वडील जे.सी पालेकर हेही पंच होते.
एकेकाळी ज्या मैदानात जाण्यास बंदी, त्याच मैदानात पंच म्हणून बजावली कामगिरी
अल्लाउद्दीन पालेकर यांचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी केप टाउन, दक्षिण अाफ्रिका येथे झाला . ४० वर्षीय पालेकर सुमारे अाठरा वर्षांपूर्वी म्हणजे २००० साली वानखेडे स्टेडियम बघण्यास आले असता त्यांना सुरक्षरक्षकाने मनाई केली होती.
त्याच मैदानावर त्यांनी २०१५ मध्ये झालेल्या मुंबई- मध्य प्रदेश या रणजी सामन्यात पंच म्हणून काम बघितले. सात वर्षांपासून बीसीसीआयच्या अंपायर एक्सचेंज योजने अंतर्गत त्यांना ही संधी मिळाली होती.
@OfficialCSA umpire exchange candidates: Bongani Jele to Australia; Allahudien Paleker to India; Babalo Gcuma to New Zealand.
— Trevor Cramer (@CramerTF) November 12, 2014
याच योजने अंतर्गत पालेकर यांना न्यूझीलंडमध्ये तसेच भारतातील रणजी सामन्यात पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. याबाबत पालेकरांनी बीसीसीआयचे आभार मानले होते.
@OfficialCSA umpire Allahudien Paleker T20i debut 😎 Congrats brother 👏 #SAvIND 🏏#ProteaFIRE 🔥 pic.twitter.com/k3NAVmly3u
— Suleman Modan (@Figjamfan) February 21, 2018
@OfficialCSA umpire Allahudien Paleker T20i debut 😎 Congrats brother 👏 #SAvIND 🏏#ProteaFIRE 🔥 pic.twitter.com/k3NAVmly3u
— Suleman Modan (@Figjamfan) February 21, 2018