---Advertisement---

“तो प्रत्येक चेंडूनंतर ओरडतो” अंपायर अनिल चौधरीनं ‘या’ यष्टीरक्षकाची उडवली थट्टा! VIDEO

Anil Chaudhary (1)
---Advertisement---

सध्या बांगलादेश संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. तत्पूर्वी बांगलादेशविरुद्धच्या रावलपिंडी कसोटीत पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवाननं शानदार शतक झळकावलं. रिझवाननं 239 चेंडूत नाबाद 171 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकार लगावले. वास्तविक, रिझवान मैदानावरील यष्टीरक्षक म्हणून त्याच्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहे. पण रिझवानच्या अपील करण्याच्या शैलीबद्दल पंचांना काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर पंच अनिल चौधरी यांनी दिलं आहे.

अनिल चौधरी (Anil Chaudhary) यांना पॉडकास्टमध्ये विचारण्यात आले की, तुम्हाला पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानबद्दल (Mohammed Rizwan) माहिती आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात अंपायर अनिल चौधरी म्हणाले की, “हो मी आशिया कपमध्ये अंपायरिंग करत होतो, रिझवान त्या सामन्यात खेळत होता. तो जवळजवळ प्रत्येक चेंडूवर अपील करतो. यानंतर मी माझ्या सहकारी पंचांना सांगितले की, रिझवान प्रत्येक चेंडूवर विकेटसाठी अपील करतो, त्यामुळे व्यवस्थित निर्णय द्या.”

मोहम्मद रिझवानच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं 31 कसोटी, 74 एकदिवसीय आणि 102 टी20 सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये रिझवाननं 44.67च्या सरासरीनं 1,787 धावा केल्या आहेत. दरम्यान त्यानं 3 शतकं झळकावली आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये रिझवाननं 89.81च्या स्ट्राइक रेटनं आणि 40.15च्या सरासरीनं 2,088 धावा केल्या आहेत, तर टी20 सामन्यांमध्ये 126.45च्या स्ट्राईक रेटनं, 48.01च्या सरासरीनं 3,313 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

बांगलादेशच्या फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर ‘बापमाणूस’ बनलेल्या आफ्रिदीचे खास सेलिब्रेशन – Video
PAK vs BAN: बाबर आझमवर भडकला कर्णधार शान मसूद? पाहा VIDEO
धवनच्या निवृत्तीनंतर सेहवागची लक्षवेधी पोस्ट; म्हणाला, “जेव्हापासून तू मोहालीत मला रिप्लेस केलंय…”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---