---Advertisement---

जगातील सर्वात मोठा अंपायरचं म्हणतोय, या ३ खेळाडूंची फलंदाजी माझी विशेष आवडती

On: सोमवार, जून 1, 2020 9:10 PM
---Advertisement---

मुंबई । क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम पाहणं तसं अवघड काम आहे. मैदानात पंच त्या ठिकाणी उभे राहतात जेथून फलंदाजाला पाहण्यासाठी योग्य जागा असते. आयसीसीचे पंच इयान गोल्ड वर्षानुवर्ष त्याच जागेवर थांबून क्रिकेटच्या इतिहासात खेळलेल्या ऐतिहासिक खेळीचे साक्षीदार बनलेत. यादरम्यान, कोणत्या तीन फलंदाजांना फलंदाजी करताना पाहायला आवडेल? असा प्रश्न या गोल्ड यांना विचारण्यात आला.

यावर इयान गोल्ड यांनी दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस याला मैदानावर खेळताना पाहायला आवडत असल्याचे एका संकेतस्थळाशी बोलताना सांगितले. त्यानंतर त्यांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचे देखील नाव घेतले.

या तिघांमध्ये रिकी पाँटिंगचे देखील नाव घ्यायचे होते. पण या दिग्गज फलंदाजांची सर्वोत्तम कारकीर्द पाहू शकले नाही याचे दुःख त्यांना आहे. रिकी पॉँटिंग एक चारित्र्यवान खेळाडू आणि उत्कृष्ट कर्णधार होता. मी क्रिकेटमध्ये आलो तेव्हा कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात होता .

सचिनच्या फलंदाजीचे आकर्षण जगातील प्रत्येक क्रिकेट प्रेमीला आहे. त्याच्या पाठीवर करोडो भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे होते. हे अपेक्षांचे ओझे घेऊन तो क्रिकेट खेळत होता. विराटच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो खूपच चांगला खेळाडू आहे. क्रिकेटमधले अनेक बारकावे त्याला माहित आहेत, असे गोल्ड म्हणाले.

इयान गोल्ड यांनी 2006 ते 2019 दरम्यान 70 कसोटी, 140 एकदिवसीय आणि 37 टी -20 सामन्यात पंच  म्हणून काम पाहिले. 2019 च्या विश्वचषकानंतर ते सेवानिवृत्त झाले. पंच म्हणून काम करण्यापूर्वी त्यांनी इंग्लंडकडून 18 एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---