भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान रिषभ पंतच्या खेळपट्टीच्या बाहेर उभे राहण्याच्या भूमिकेवर इंग्लंडच्या पंचांनी आक्षेप का घेतला? असा प्रश्न विचारला आहे. कारण नियम फलंदाजांना असे करण्यापासून रोखत नाहीत, असे त्यांचे मत आहे.
पंतने खुलासा केला होता की, त्याला पंचांच्या सांगण्यावरून आपली भूमिका बदलावी लागली. कारण स्विंग चेंडूमना सामोरे जाण्यासाठी खेळपट्टीच्या बाहेर उभे राहून खेळपट्टीच्या धोक्याच्या क्षेत्रात पावलांचे ठसे उमटत होते. गावसकर मात्र म्हणाले की, खेळपट्टीवर बुटांनी बनवलेल्या खुणा फलंदाजाचा स्टान्स ठरवत नाहीत.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (27 ऑगस्ट) भाष्य करताना गावसकर म्हणाले, “जर हे खरे असेल तर, मी विचार करत होतो की रिषभला त्याचा स्टान्स बदलण्यास का सांगितले गेले?. मी याबद्दल वाचले आहे. फलंदाज खेळपट्टीवर कुठेही उभे राहू शकतो, अगदी खेळपट्टीच्या मध्यभागीही. फलंदाज कधीकधी फिरकीपटूंना पुढे येऊन खेळतात. त्यानेही पाऊलखुणा तयार होऊ शकतात.” त्याचवेळी, समालोचक आणि भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनीही पंचाच्या या कृतीस हास्यास्पद म्हटले आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा डाव 78 धावांवर गुंडाळला गेला. पंतने दिवसभराच्या खेळानंतर या घटनेचा उल्लेख केला होता. तो म्हणाला होता, “मी खेळपट्टीच्या बाहेर उभा होतो आणि माझा पुढचा पाय खेळपट्टीच्या संवेदनशील भागात येत होता. म्हणून पंचांनी मला सांगितले की मी येथे उभा राहू शकत नाही. त्यामुळे मला माझा स्टान्स बदलावा लागला. पण एक क्रिकेटपटू म्हणून, मी याबद्दल फारसा विचार करत नाही. कारण एखाद्या दुसऱ्या खेळाडूने असे केले असते तरीही, पंचाने त्याला तेच सांगितले असते. पुढच्या चेंडूवर मी तसे केले नाही.”
पंचांच्या या निर्णयानंतर आयसीसीने तटस्थ पंचांचा वापर करावा की नाही? यावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे. आयसीसीने कोविड -19 महामारी दरम्यान प्रवास प्रतिबंधामुळे केवळ स्थानिक पंचांच्या वापरास परवानगी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारतीय संघ लढवय्या, पण हे लीड्स आहे कोलकाता नाही,’ इंग्लंडच्या माजी क्रिकेटरची चेतावणी
हेडिंग्ले कसोटीत भारताची दुर्गति होण्यास कोहलीचा ‘तो’ निर्णय जबाबदार; माजी क्रिकेटरने टोचले कान